Tadpatri Vatap : झोपडपट्टीवासीयांना महेश मेंढे यांनी दिला आधार

Tadpatri Vatap चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, बेनार चौक परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टी वासीयांना गोरगरीब गरजू लोकांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

दोन दिवसापूर्वी चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशा कुटुंबांच्या मदतीसाठी महेश मेंढे यांनी तात्काळ धाव घेतली असून तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत.

चंद्रपूर मुख्य बस स्थानकावर चोरीचे वाढते प्रमाण, सीसीटीव्ही कॅमेरे लावा – चंदा वैरागडे

Tadpatri vatap मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागांना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरत्या छप्पर म्हणून वापरल्या जातील. त्यामुळे त्यांना थोडा आसरा मिळेल या उद्देशाने त्यांना ताळपत्रीचे वाटप करण्यात आले. ताळपत्री वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर उपक्रमात लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

यावेळी ताळपत्रीचे वाटप करतांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांचेसह  मनपाचे माजी नगरसेवक वसंतदादा देशमुख, समाजसेविका सौ. वैशाली चंदनखेडे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चंदनखेडे , उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!