The defense wall collapsed : त्या बोगस बांधकाम विरोधात आप पक्षाचा एल्गार

The defense wall collapsed दिनांक 08 जुलैला रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने नगर परिषद वरोरा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नुकताच शहरात मुसळधार पावसाने हजेरी दिली. राजीव गांधी वॉर्ड वरोरा येथे 2 महिन्याअगोदर नालीचे बांधकाम करून संरक्षण भिंत उभी करण्यात आले होते. त्याच नालीचे बांधकाम इतके बोगस होते की, पहिल्याच पावसात नालीचे पूर्ण बांधकाम व संरक्षण भिंत वाहून गेले व त्यामुळे सर्व नालीचे पाणी हे लोकांच्या घरात घुसले. त्यामुळे राजीव गांधी वॉर्ड मधल्या लोकांचे हाल झाले.

अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार

लोकांच्या घरात कमरे इतके पाणी साचले होते. साप, विंचू मुळे जीवाला धोका निर्माण झाला होता. पाण्यामुळे लोकांचे धान्य ओले होऊन खराब होण्याच्या स्थितीत होते. या विषयाची माहिती आम आदमी पार्टी वरोरा चे तालुका अध्यक्ष गौरव मेले यांनी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना दिली. त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली व नगर परिषद वरोरा चे मुख्यधिकारी साहेब यांचाशी दूरध्वनी द्वारे संपर्क केले असता ते म्हणाले की, मी इंजिनियर साहेब यांना जागेवर पाठवत आहो व योग्य ते मदत करू असे आश्वासन दिले. परंतु त्या जागेवर इंजिनियर साहेब पोहचू शकले नाही व नागरिकांना मुख्याधिकारी यांनी आश्वासन देऊन सुद्धा मदत भेटू शकली नाही.

 

The defense wall collapsed त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष गौरव मेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसामान्य नागरिकांना घेऊन नगर परिषद वरोरा समोर ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन द्वारे इशारा दिला की येत्या सात दिवसाच्या आत नालीचे बांधकाम पूर्ण करा व येत्या पंधरा दिवसाच्या आत नालीचे बांधकाम बोगस करणाऱ्या ठेकेदारावर व इंजिनियर वर कार्यवाही करा अन्यथा येत्या काळात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले व असंख्य महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!