The flood is receding : चंद्रपुरातील हा मार्ग पुन्हा सुरू

The flood is receding चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, अनेक ठिकाणचे मार्ग पूर परिस्थितीमुळे बंद होत असल्याचे चित्र निर्माण झालं होतं, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपूर, गडचांदूर, भोयेगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पुल पाण्याखाली गेला होता हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. सध्या पुलावरून 4 फूट पाणी कमी झाले आहे, जर पाऊस परत आला तर पुन्हा हा मार्ग बंद होऊ शकतो.

अवश्य वाचा : पूर बघायला जात आहे, तर ही सूचना आधी वाचा

Chandrapur District Flood Updates 22 जुलै रोजी वर्धा नदीचे पाणी कमी झाल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्गावर असणाऱ्या पुलावर पाणी कमी झाल्याने, सदर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 22 जुलैला रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. पोलीस दलाच्या वतीने नागरिकांनी पूर बघायला जाऊ नये असे आवाहन केले आहे.

पूर ओसरतोय

पूर ओसरल्यावर त्याठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, कसल्याही विद्युत वस्तूला स्पर्श करू नये, सापाबद्दल सावधगिरी बाळगा, पुराच्या पाण्यात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!