Tree plantation चंद्रपूर – वाढदिवस म्हणजे आपल्या जन्माचा दिवस यादिवशी उपक्रम, सामाजिक कार्य किंवा परिवार व मित्रांसोबत पार्टी करण्याचे काम होतात, मात्र याउलट एक आगळावेगळा उपक्रम चंद्रपू शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी केला.
वाढदिवस 18 जुलै चा मात्र 1 जुलै पासून उत्कृष्ठ महिला मंच च्या माध्यमातून छबू वैरागडे यांनी शहरात वृक्षारोपणाचे अभियान सुरु केले.
हे अभियान 100 ते 200 वृक्ष लावण्यापर्यंत नव्हते तर तब्बल 3 हजार वृक्षांची लागवड या 18 दिवसात झाली आहे.
यावर्षी उन्हाळ्यात शहर अतिउष्ण झाले, याचे कारण शहरात वृक्षाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी आपल्या वाढदिवसापर्यंत मनात चंग बांधला कि आपण शहरात विविध वृक्षाची लागवड करावी, यासाठी जनजागृती करण्यात आली, विशेष बाब म्हणजे वृक्षरोपण केल्यावर त्या रोपाला 6 महिने जपविणे व त्यासोबत नागरिकांनी आपला फोटो पाठविल्यास त्यांना प्रोत्साहनपर म्हणून पुरस्कार देणे.
वैरागडे यांच्या या उपक्रमाला उत्कृष्ट महिला मंच सदस्य व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Tree plantation 1 ते 18 जुलैपर्यंत नागरिकांनी शहरात 3 हजार वृक्षारोपण केले, यामध्ये विश्वकर्मा नगर अग्रसेन भवन च्या मागे राजेंद्र गुंडांवार यांच्या सहकार्याने 125 वृक्षारोपण, सोनचाफा मंदिर पठाणपुरा गेट बाहेरील माना रोड वर मंगला पवार यांच्या माध्यमातून 150 झाडे, इरई धरण मार्गावर संगीता पराते यांनी 50 झाडे लावली. जगन्नाथ बाबा मठ पठाणपुरा दीपाली मद्दीवार यांनी 60 झाडे लावली, हिवरपुरी हनुमान मंदिर पठाणपुरा माया खनके यांच्या माध्यमातून 65 झाडे, श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल जवळ प्रतिभा रेगुंटवार यांनी 10 झाडे लावली.
अश्याप्रकारे विविध ठिकाणी वृक्षारोपण व 18 जुलै रोजी छबू वैरागडे यांच्या वाढदिवशी उत्कृष्ट महिला मंडळ सदस्यांनी 600 झाडांचे वृक्षारोपण केले.
दुपारी 10 भजन मंडळांना साउंड सिस्टीम भेट स्वरूपात देण्यात आले.
सायंकाळी सर्व वृक्ष प्रेमींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साक्षी कार्लेकर, मनीषा कन्नमवार, सारिका भुते, किरण बल्की, पायल अन्नलदेवार, माया खनके, मंगला रुद्रपवार, जयश्री साखरकर, संगीता पराते, नीलिमा रघाताटे, दीपाली मद्दीवार, प्राची अंबाझरे, वैशाली पेडसेलवार, पूजा पडोळे, प्रणिता जुमडे, योगिता धनेवार, मनीषा भाके,सुवर्णा लोखंडे यांचे या वृक्षारोपण मोहिमेत सर्व सदस्य चे सहकार्य लाभले.