Vidhansabha Nivadnuk : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभेत “झाडू” स्वबळावर

Vidhansabha nivadnuk चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. या निमित्ताने, पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाचे प्रतीक असलेले ‘झाडू’ चिन्ह जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले होते. त्या निवडणुकीत झाडू चिन्हावर 2 लाखांहून अधिक मतदान झाले होते, जे पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.

व्हाट्सएपच्या माध्यमातून खासदार धानोरकर यांच्या मोबाईल वर आला संदेश आणि घडलं असं..

आम आदमी पार्टी हा शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसह मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमेदवारी नोंदणीसाठी पात्र व्यक्ती:

  • आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते
  • सामाजिक कार्यकर्ते
  • इतर पक्षांमधून येऊ इच्छिणारे कार्यकर्ते
  • चंद्रपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवू इच्छिणारे सर्व नागरिक

सर्व इच्छुकांनी उमेदवारी नोंदणीसाठी खालील लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरावा:
aapmaharashtra.com/app

Vidhansabha nivadnuk “चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 2014 च्या निकालांवरून स्पष्ट होते की जिल्ह्यात आमच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे,” असे आवाहन मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

जिल्ह्यात आप पक्षाची ताकद कमकुवत असली तरी आजही आप चे कार्यकर्ते तळागाळात आहे, जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम आदमी पक्षाने केले आहे, आप ची स्वबळाची घोषणा प्रस्थापित पक्षांना बुचकळ्यात नक्कीचं आणू शकते.

आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे, सध्या आप ने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आप च्या माध्यमातून तरुणांना राजकारणात येण्याची संधी मात्र नक्की उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे राजकारणाची दिशा अवश्य बदलेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!