Vitthal mandir chandrapur राज्यातील पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची पंढरीची वारी सुरू आहे, त्यानिमित्ताने चंद्रपूर शहरातील पुरातन विठ्ठल मंदिर येथे 17 जुलैला सकाळी 11 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक विठ्ठल रुकमाई चे दर्शन घेतले.
शहरातील २५० वर्ष पुरातन असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार किशोर जोरगेवार यांनी जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सर्वांच्या सुख समृद्धीसाठी जोरगेवार यांनी प्रार्थना केली. शेतकरी बांधवांना यश दे समृद्धी प्रदान कर अशी प्रार्थना त्यांनी आज विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन केली. यावेळी उपस्थित भाविक – भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी कलम 36 केले लागूशहरातील विठ्ठल मंदिर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य पालखी निघते, यावेळी भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पाडतो, आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन केल्यावर त्यांच्याजवळ एक वृद्ध व्यक्तीने भेट घेत त्यांचे आभार मानले. Vitthal mandir chandrapur
आमदार जोरगेवार यांनी कारण विचारले असता ते म्हणाले की आज आम्हाला मुलांचा आधार नाही मात्र तुम्ही आम्हाला अम्मा का टिफिन माध्यमातून जी मदत केली तशी मदत आज सख्खा मुलगा सुद्धा करीत नाही, असे उदगार त्या इसमाने काढल्यावर आमदार किशोर जोरगेवार यावेळी भावुक झाले होते.