water supply : 12 लाख रुपये थकले, वीज वितरणने केली कारवाई

Water supply 12 लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण ने पाणीपुरवठा विभागाची वीज कापली त्यामुळे नजीकच्या गावातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला. सदर पाणीपुरवठा सुरू करावा ही मागणी घेऊन डॉ.गावतुरे यांनी वीज वितरण च्या अभियंत्यासोबत चर्चा केली.

Water supply डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी ग्रामपंचायत बेंबाळ येथे भेट दिली असता बेंबाळ व लगतच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे विज बिल थकीत असल्याच्या कारणाने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा विभागाची वीज कापली अशी माहिती मिळाली.


गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाची 12 लाखाची वीज बिल थकीत आहे अशी माहिती वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांनी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना दिली पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोबत चर्चा केली असता ती जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची नसून संबंधित ग्रामपंचायतीचे आहे आणि म्हणून ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी अशी माहिती त्यांनी दिली.

अवश्य वाचा : गावाच्या मध्यभागी बिबट्याचा धुमाकूळ, 6 जणांना केले जखमी


पण एन पावसाळ्यामध्ये जेव्हा साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि अशावेळी । शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना झाला नाही तर साथीच्या रोगाची लागण, कालरा टायफाईड होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि म्हणून डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी अशा अटीतटीच्या वेळी प्रशासनाने या प्रकरणी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर नागरिकांना शुद्ध पाणी कसे मिळेल याची तजवीज करावी अशी मागणी केली आहे अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास आणि जीवित हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असेही त्या म्हणाल्या.


प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची शिक्षा सामान्य नागरिकांना आणि मुलांना का आणि त्यांचे आरोग्य धोक्यात का असा सवालही त्यांनी केला महोत्सवाच्या नावावर करोडो रुपयाची उधळपट्टी करणारं शासन नागरिकांना आणि लहान मुलांना शुद्ध पाणी देऊ शकत नाही ही या देशाची फार मोठी शोकांतिका आहे म्हणून संबंधित विभागांनी त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा आणि यावर प्रशासकीय पातळीवर तोडगा काढावा अशी विनंती वजा सूचना ही डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!