Wildlife attacks : मानव-वन्यजीव संघर्ष थांबणार कधी? – डॉ. अभिलाषा गावतुरे

Wildlife attacks सावली – सावली तालुक्यातील कवठी येथे सकाळी १०.३० वाजता शेतीत काम करणाऱ्या शेतकरी बांधवां वर रानडुक्करांने हल्ला केला. हल्ल्यात आनंदराव नामदेव चौधरी रा.सावली यांचा मृत्यु झाला असून सुरेश आकुलवार, निर्मला आकुलवार, स्वप्नील आकुलवार शेतकरी व तन्नु नायबनकर, केशवी पाल, दुर्गा दहेलकार या शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत.

एकाच दिवसात रानडुक्करांने सात लोकांवर हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतीचा हगांम सुरू असून मोठ्या प्रमानावर शेतीची कामे सुरू असल्याने मजुरांचा तूटवडा आहे अश्या स्थीती मध्ये सावली परिसरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानडुक्कर व हिंस्र वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याने शेतीचे कामे प्रभावीत झाली आहे.

झोपडपट्टीवासीयांना कांग्रेस नेत्याने दिला आधार

Wildlife attacks अनियमित पाऊस व शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी हवादील झाला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरी कडे वन्यप्राण्याचे हल्ले अश्या दुहेरी संकटात सापडलेला जगाचा पोशिंदा शेतकरी पुर्ण पणे हतबल झाला आहे.


वनविभाग हजारो कोटी रुपयाची उधळपट्टी करून उद्यान निर्माण करने, बिनकामाच्या इमारती निर्माण करने, व्याघ्र प्रकल्पाच्या नावा खाली श्रीमंताचे होटेल व्यवसाय मोठे करने याला विकासाचे गोंडस नाव देत जनतेची दिशाभूल करित असून वनविभागाने उद्यान व इमारती निर्माण करण्याची कामे तात्काळ थांबवून मानवावरिल वन्यप्राण्याचे होणारे हल्ले कमी करण्या करिता उपाययोजना करून मानव-वन्यजीव संघर्ष थांबवीण्याचे काम करावे ही मागणी जनते कडून होत आहे.


रानडुक्करांच्या हल्लयात एक शेतकरी मृत पावला तर तीन शेतकरी व तीन शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
डॅा. अभीलाषा गावतुरे यांनी मृतकाच्या परिवाराला सावली येथे भेट दिली व आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी लवकरात लवकर मृतकाच्या परिवाराला आणि जखमींना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळवून द्यावा अशा सूचना डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट दिली.

चंद्रपूर मुख्य बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावा


वाघांच्या आणि डुकरांच्या जीवाला किंमत आहे पण मनुष्य प्राण्यांच्या जीवाला सरकारच्या नजरेत अजिबात किंमत नाही काय असा सवाल डॉक्टर गावतुरे यांनी उपस्थित केला.


वनविभागाच्या चुकीच्या नियोजनांची फळे जनतेला जिव देऊन चुकवावी लागत असल्याची खंत या हल्ल्यातील जखमींना भेटल्या नंतर त्यांनी व्यक्त केली. यावेळी सावली येथील प्रतिष्ठित नागरिक अतुल लेनगुरे ,साधनाताई वाढई,मनोज चौधरी भारतीताई चौधरी ,मोहन गाडेवार, सचिन सांगिडवार, नितेश रस्से ,भोगेश्वर मोहरले देवराव मोहुरले गणपत वाढई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!