Zp school chandrapur आमच्या शाळेला शिक्षक द्या या नाऱ्या सोबत शेकडो विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयावर दिनांक 5 जुलै 2024 रोजी धडकले होते. नवेगाव मोरे जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी निदर्शने करण्यासाठी पालकांसहित आणि गावकऱ्यांसहित जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते.
महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना
या मोर्च्याचे शिक्षण बचाव समिती सदस्य व भूमिपुत्र ब्रिगेडच्या संयोजिका डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी नेतृत्व केले होते, विद्यार्थी यांच्या मागणीची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना घ्यावी लागली.
जिल्हा परिषदेने नवेगाव मोरे तालुका पोम्भूर्णा साठी 3 शिक्षकांची नियुक्ती केली, असा आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढला.
अवश्य वाचा : नकारात्मक मूल्यांकन देणाऱ्या अधिकाऱ्याला खासदार धानोरकर यांनी दिला दणका
Zp school chandrapur गेल्या कित्येक दिवसापासून नवेगाव मोरे जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये 6 वर्ग आणि १८७ विद्यार्थी असताना सुद्धा फक्त 2 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्या भरवशावर ही शाळा सुरू होती.
प्रत्येक वर्गासाठी शिक्षक द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. गेली कित्येक वर्ष जिल्हा परिषद च्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे. दोन शिक्षकांच्या भरवशावर एवढी मोठी शाळा आणि 5 वि ते दहावी वर्ग कसे काय चालू शकतात आणि या सात वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा होऊ शकतो अशा खोचक प्रश्न यावेळी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना केला होता.
फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अशी अधोगती या राज्य सरकारच्या शिक्षण विषयक अनास्थेमुळे झालेली आहे असा आरोप त्यावेळी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केला होता.
Zp school chandrapur आज मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याबद्दल आणि एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द केल्याबद्दल अभिलाषा गावतुरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पण सोबतच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे की वर्गाच्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षक नाहीत आणि त्या सर्व शिक्षकांच्या नियुक्ती होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशाराही भूमिपुत्र ब्रिगेडच्या अभिलाषा गावतुरे यांनी दिला आहे.