Obc Yatra गुरू गुरनुले – ओ.बि.सी. बांधवांना त्यांचे हक्क त्यांच्या संख्येनुसार शैक्षणिक सवलती, त्याचा वाटा,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहात आरक्षण,ओबीसी शेतकऱ्यांना मोफत योजना इत्यादी मागण्या व प्रश्न घेऊन नागपुर वरून निघालेली मंडल यात्रा चंद्रपूर मार्ग पोंभूरणा चिरोली वरून मूल नगरात गांधी चौकात आगमन झाल्याबरोबर फटाक्याच्या आतिष बाजित, ढोलताशाच्या धूम धडाक्यात मुल तालुका ओबीसी महापरिषद व बहुजन समता पर्वच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. संजय घाटे आणि असंख्य ओबीसी बंधू भगिनीनी यात्रेचे स्वागत केले.
बिबट्याने जंगलात घेतला आश्रय, आणि 3 बछड्याना दिला जन्म
Obc yatra महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले.मंडल यात्रा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी, अनेक प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपला लढा सुरू राहणार असे मार्गदर्शन यात्रेचे मुख्य स्वागताध्यक्ष डॉ.संजय घाटे यांनी केले. २४ तारखेला होणाऱ्या बहुजन समता पर्व ओबीसी महापरिषदेला ह संख्येनी उपस्थित राहण्याचा डॉ. संजय घाटे यांनी केले. तर मंडल यात्रेचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी ओबीसींची जातीय जनगणना झाल्याशिवाय ही यात्रा स्वस्त बसणार नाही. असे दमदार बोलून ओबीसींच्या अनेक प्रश्नांना उजाळा दिला. याप्रसंगी एड.सातपुते, मालेकर सर यांनीही ओबीसीना मार्गदर्शन केले.
यात्रेच्या स्वागतासाठी अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोरे,राकेश रत्नावार,गुरुदास चौधरी, डॉ.पद्माकर लेंनगुरे,गुरु गुरनुले, संजय पडोळे,जितेंद्र बल्की, बंडू गुरनुले, ईश्वर लोनबले, कैलाश चलाख, इत्यादींनी यांनी मेहनत घेतली. यात्रेच्या ठिकाणी. सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, राजू मारकवार यांनीही यात्रेची वाट बघून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ओबीसी बांधव घनश्याम येणुरकर,प्रा. विजय लोनबले, प्रशांत गट्टूवार, पूरुशोत्तम्म भूरर्से, सुनील शेरकि, राकेश मोहूर्ले,प्रशांत भरतकर, प्रकाश मारकवार, युवराज चावरे, शुभम गावतुरे, तेजस वाढई, शशिकांत गणवीर, नीमगडे सर, नंदू बारस्कर, ओबीसी महिला शांताबाई, रत्ना चौधरी, कविता मोहुर्ले ,रुपाली संतोषवार,शामला बेलसरे,संमता बनसोड, सीमा भसारकर, नाजुका लाटकर,व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ओमदेव मोहूर्ल यांनी केले.