leopard cubs वाघ असो किंवा बिबट नेहमी जंगलातच बछड्यांना जन्म दिल्याचे ऐकले आणि पाहिले आहे. पण चक्क घरात एखाद्या मादी बिबटने बछड्यांना जन्मास घातल्याचे सांगितले तर विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एक घटनासमोर आली आहे. जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील बाळापूर गावात जंगलाशेजारी असलेल्या एका पडक्या घरात मादी बिबटने तिन बछड्यांना जन्म दिला आहे.सध्या तिन्ही बछडे तंदूरूस्त असून त्याच ठिकाणी वनविभागाच्या निगरीत आहेत.
अमृतसर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन
Leopard cubs चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. परंतु आता ताडोबाच नव्हे तर ताडोबाच्या बाहेरील जंगलातही वाघ आणि बिबट्यांचे नगारिक, शेतकरी, शेतमजूरांना दर्शन होणे नित्याची बाब झाली आहे. नागभिड तालुक्यात तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत तळोधी मेंडकी मार्गावर बाळापूर दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाशेजारी जंगल लागून आहे. त्यातील काही घरे जंगलालाच लागून आहे. जंगलाला लागून असलेल्या एका पडक्या घरातून आज सोमवारी सकाळच्या सुमारास एक बिबट घरातून बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिक भयभित झाले.
बऱ्याच दिवसांपासून या गावात शेजारी बिबट्याने रात्री बेरात्री येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरूच आहे. आज सोमवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने वनरक्षक मैंद यांना माहिती देण्यात आली. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी येऊन काही नागरिकांना सोबत घेऊन त्या पडक्या घरात बघितले असता त्या ठिकाणी मादी बिबटचे तिन बछडे आढळून आले. ज्या घरात बछडे आढळून आले तो घर पडका आहे. त्या ठिकाणी कुणीही वास्यात्यास नाही. शिवाय तो घर जंगलाला लागून आहे. वनरक्षक मैंद यांनी, नागभिडचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्श्नात तळोधी (बा.) राऊंड ऑफिसर नेरलवार व त्यांच्या चमुने घटनास्थळी भेट दिली. त्यांना घरात बिबटचे बछडे आढळून आले. घर आणि सभोवती परिस्थीची पाहणी केली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बछडे सात आठ दिवसांपूर्वी जन्मास आले आहेत. दिवसा मादी बिबट या ठिकाणी राहत नाही. रात्रीच्या वेळी मादी बिबटचे वास्तव्य आहे.
मादी बिबटचे बछडे असल्यामुळे नागरिकांना धोका होऊ नये याकरीता त्या घराच्या सभोवती तिन्ही बाजूंनी जाळी लावण्यात आली आहे. जंगलाच्या दिशेचा रस्ता जाणेयेणेसाठी मोकळा ठेवण्यात आला आहे. बिबट मादीच्या हालचालीवर निगराणी ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राचे अधिकारीकर्मचारी त्या बिबट मादी व बछड्यांवर नजर ठेवनू आहेत. आता पर्यंत जंगलात सुरक्षित ठिकाणी बिबट जन्मास येण्याचे पाहिले होते, परंतु बाळापूर गावातील घटनेवरून घरात मादी बिबटने बछड्यास जन्मास घातल्याचे नागरिकांना बघायला मिळाले आहे.