Midnight March देशात व राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मात्र या सर्व घटनांपासून चंद्रपूर जिल्हा सुरक्षित रहावा यासाठी 31 ऑगस्टला चंद्रपुरात भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
31 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता चंद्रपुरातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, पोलीस प्रशासन, आमदार व खासदार हे महिला सुरक्षेप्रती हातात धगधगणारी मशाल घेत रॅली मध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती 30 ऑगस्टला आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी दिली. रात्री 9 वाजता गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत या रॅली ला सुरुवात होणार आहे.
अवश्य वाचा : शिक्षकांचा वाढदिवस आणि त्या दिवशी त्यांच्या अंगात संचारली अश्लील वृत्ती, पोलिसांनी केली अटक
Midnight March सदर रॅलीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे या मशाल रॅली मध्ये सामील होत महिला सुरक्षेची शपथ घेणार आहे. रॅली पूर्वी स्त्री शक्ती दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी सादरीकरण होणार आहे. मशाल प्रज्वलन झाल्यावर भारतीय राज्यघटना च्या उद्देशिकेचे वाचन करीत रॅली ला सुरुवात होणार, रॅलीचे समापन स्थळी महिला सुरक्षा शपथ उपस्थित सर्व नागरिक घेणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अश्या घटना होऊ नये यासाठी आता सर्व सामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा, सर्वांनी एकत्र येत चंद्रपूर सुरक्षित करूया व महिला अत्याचाराच्या घटना टाळू या असा उद्देश या रॅली चा आहे. चंद्रपुरातील नागरिक जेव्हा एकत्र येणार त्यावेळी जिल्ह्यातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार.
Midnight march चंद्रपूर जागृती मशाल मंच द्वारे आयोजित रॅली मध्ये सर्व सामान्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पारोमिता गोस्वामी, अश्विनी खोब्रागडे, प्रितिषा साधना, जयश्री कापसे, वर्षा जामदार यांनी केली आहे.
रॅली नंतर काय?
महिलांना वाटणाऱ्या अंधाराची भीती घालवण्यासाठी मध्यरात्री मार्च चे आयोजन करण्यात आले मात्र त्यानंतर काय? कारण यापूर्वी महिला संघटना विविध पक्षातील राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी अस्तित्वात आणली होती मात्र आता ती संघटना नाहीशी झाली आहे, या रॅली बाबत असे होऊ नये म्हणून संघटनेच्या सदस्यांनी ही सुरुवात आहे, आम्ही आता प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणार आहोत, कुठल्याही परिस्थितीत अश्या घटना कश्या टाळता येणार यावर आमचं कार्य सुरू होणार आहे. अशी माहिती जागृती मशाल मंच सदस्यांनी दिली.