Shocking incident चिमूर –चिमूर तालुक्यातील खडसंगी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मजरा (बे) येथील बाप-लेक शेतातील कामे आटपून घरी जात असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते त्या पाण्यातून बाप लेक बैल जोडी घेऊन जात असताना पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला व वडिलांचा हाथ सुटल्याने एक बैल व मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
राजकीय – जुनी पेन्शन योजना लागू होणार?
Shocking incident सदर घटना बुधवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान मजरा भानसुली रस्त्यावरील नाल्यात घडली समीर वामन राणे वय १८ वर्ष असे पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील माजरा येथील रहिवासी वामन राणे व मुलगा समीर राणे शेतात रोवणीच्या कामासाठी सकाळी गेले होते दिवसभर काम करून सायंकाळी चार वाजता दरम्यान घरी जाण्यासाठी बापलेक निघाले मात्र एक तासापूर्वी झालेल्या पावसामुळे गावाजवळील नाल्याला पूर आला त्या पुरातून वडील वामन राणे व मुलगा समीर राणे बैल जोडी घेऊन जात होते अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यातच समीरचा हाथ सुटल्याने एक बैल व समीर वडिलांच्या डोळ्यादेखत पुरात वाहून गेला बैल परतून पोहून बाहेर आला मात्र समीरचा पत्ता लागला नाही.
प्रेरणादायी : चंद्रपूर जिल्ह्यातील 95 नागरिकांची कॅन्सरवर मात
समीर च्या शोध मोहिमेकरिता तहसीलदार राजमाने, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, भाजपचे तालुका अध्यक्ष राजूपाटील झाडे आपल्या पदाधिकारी सह हजर आहेत. घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून समीर राणेंचा शोध घेत आहेत.