Kajal चंद्रपूर – चंद्रपूर शहरात एका काजळाच्या डबीने कुटुंबाचा जीव टांगणीला लावला.2 ऑगस्टला चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील 8 महिन्याच्या बाळाने खेळताना काजळाची डबीच गिळली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
अवश्य वाचा : घराच्या छतावर गाड्यांचा खच, मनपाने बजावली नोटीस
Kajal चंद्रपूरच्या कान -नाक- घसा तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ती डबी अलगद बाहेर काढली. श्वासनलिकेत अडकलेली ही डबी क्लिष्ट ठिकाणी असली तरीही बाळाचा श्वास मात्र सुदैवाने सुरू राहिला. त्यामुळे बाळ बचावले. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने हे शक्य झाले. अन्यथा अनर्थ ओढविला असता.
गुन्हेगारी : चंद्रपूर जिल्ह्यात 6 तडीपार
2 ऑगस्टला सकाळच्या सुमारास बाबूपेठ भागातील मंजुषा मेश्राम या आपल्या 8 महिन्याचा बाळा सोबत बसून होत्या, निरागस बाळ खेळत असताना त्यांच्या हातात काजळाची डबी लागली, आई ला वाटलं तो खेळत आहे, मात्र त्याने नकळत ती डबी तोंडात टाकत गिळून टाकली, आईने ती डबी काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, गळ्यात डबी अडकल्याने बाळ रडू लागले, मात्र आई मंजुषा मेश्राम ह्यांनी तात्काळ शहरातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ मनीष मुंदडा यांच्याकडे धाव घेतली, त्यांनी काही प्रयत्नात ती डबी बाहेर काढली आणि बाळाचा जीव वाचला.
डॉ.मनीष मुंदडा काय म्हणाले?
ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत तिथे सहज तोंडात टाकण्यासारख्या वस्तू पसरून न ठेवण्याचे आवाहन कान नाक घसा तज्ञ डॉ मनीष मुंदडा यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. मोबाईल चा वापर सध्या मोठया प्रमाणात वाढलेला आहे, यामुळे लहान मूल असो की युवक, युवती व जेष्ठ सर्वांच लक्ष फक्त मोबाईल मध्ये असत त्यामुळे असे प्रकार कुठेही घडू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी.