unidentified dead body
राज्यात दररोज अनेक अनोळखी मृतदेह आढळत असतात काहींचे नैसर्गिक मृत्यू तर काहींची हत्या करण्यात येते,
मात्र त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने तेही कसोशीने प्रयत्न करतात, काही प्रकरणात पोलिसांना यश मिळत तर काही प्रकरणात मृतदेहाला ओळख पटत नाही, असाच एक प्रकार राज्यातील ठाणे जिल्ह्यात घडला आहे.
unidentified dead body ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ पूर्व येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकोळे गावाच्या डोंगरावर 19 जून रोजी 30 वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
त्या महिलेची अज्ञात इसमाने ओढणीने गळा आवळून तिला ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी काकोळे गावाच्या डोंगराजवळ त्या महिलेचा मृतदेह झुडपात फेकला.
मयत महिलेचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने तिची ओळख सध्यातरी पटलेली नाही, अंबरनाथ पूर्व हद्दीत अनेकांना त्या वर्णनाच्या महिलेबाबत विचारणा पोलिसांनी केली मात्र अद्यापही त्या मृतक महिलेची ओळख पटलेली नाही.
अवश्य वाचा : बांधकाम का पाडले म्हणून आमदार अधिकाऱ्यांवर संतापले
महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे..
वय अंदाजे 30 वर्ष, अंगात नेसुस मेहंदी रंगाचा सलवार, काळ्या रंगाची स्लिप, गळ्याभोवती हिरव्या रंगाची ओढणी, उजव्या हाताच्या बोटात लाल मणी असलेली धातूची अंगठी.
unidentified dead body सदर वर्णनाच्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असेल किंवा कुणाच्या ओळखीची असेल तर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी 9657811111, 7868872786, शिवाजी नगर पोलीस ठाणे अंबरनाथ पूर्व – 0251-2607020, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत – 9923036232, पोलीस निरीक्षक गुन्हे तुकाराम पादिर – 7744815038 वर सम्पर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.