Haryana Pattern वीज कंत्राटी कामगारांनी 12 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे, 12 ऑगस्ट पासून चंद्रपूर वीज वितरण कार्यालय समोर साखळी उपोषण करीत आज 20 ऑगस्टला पालकमंत्री यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे यांनी दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला नकार दिल्याने मनपा समोर आंदोलन करण्यात आले.
महत्त्वाचे : महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर यांची पंतप्रधान मोदी कडे मागणी
Haryana Pattern राज्याचे तीन वीज उद्योग महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी बरेच वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे मात्र वीज कामगाराना अद्यापही न्याय मिळाला नाही.
त्यामुळे साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन असे नियोजन करण्यात आले होते मात्र आज पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन कर्त्यांनी मनपसमोर ठिय्या आंदोलन करीत नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे कार्यकारी अधिकारी यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रत्येक वीज वितरण कंपनी मध्ये हरियाणा पॅटर्न राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
जर मागण्या आंदोलनामुळे मान्य झाल्या नाही तर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ पायी मोर्चा व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार अशी माहिती हेमराज गेडे यांनी दिली.
काय आहे हरियाणा पॅटर्न?
कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत, असे विविध कंत्राटी कामगारांच्या हिताचे निर्णय हरियाणा राज्यात घेतले जातात ती पद्धत आपल्याकडे हरियाणा पॅटर्न म्हणून राबवावी अशी मागणी कामगारांनी केलेली आहे.