Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे.
अवश्य वाचा : शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकले गढूळ पाणी
Chandrapur police चंद्रपूर जिल्ह्यातील 6 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे, यामध्ये घुग्गुस येथील 2 व चंद्रपुरातील 4 गुन्हेगारांचा समावेश आहे.
घुग्गुस येथील आमराई वार्डातील 33 वर्षीय वतन लक्ष्मण ताटपेल्ली (6 महिण्याकरिता हद्दपार) , 24 वर्षीय करन अर्जुन नाईक (1 वर्षाकरिता हद्दपार), 26 वर्षीय रोहन रणधीर कंजर (1 वर्षे) , 37 वर्षीय नरेश रामबाग कंजर (1वर्ष), 38 वर्षीय महेंद्र आनंदराव ढुमने (1 वर्ष), 43 वर्षीय मोहम्मद शोएब अब्दुल हासम (6 महिण्याकरिता हद्दपार) यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.
महत्त्वाचे : चंद्रपुरात भूस्खलन, 20 फूट खड्ड्यात पडली महिला
आता पर्यंत चंद्रपूर पोलीस दलामार्फत 3 MPDA व 22 तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी सण उत्सव बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस कारवाई करीत आहे.
नजरेत न पडणारी गुन्हेगारी
विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या नजरेत न पडणारी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अवैध वाळू तस्करी, तंबाखू तस्करी, कोळसा तस्करी यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, गोंडपीपरी येथे वाळू तस्करी च्या वादातून गावकऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता.
पोलिसांनी ही धडक मोहीम कायम ठेवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात संपुष्टात येईल, जिल्ह्यात खाकी वर्दीचा धाक यामाध्यमातून गुन्हेगारांच्या मनात घर करून बसायला हवा, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, घुग्गुस पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, रामनगर पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या गुन्हेगार दहशतीमध्ये आले आहे, मात्र येणाऱ्या काळात ही दहशत कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अजून कठोर पावले उचलावी लागतील.