Mp Pratibha Dhanorkar : खासदार धानोरकर यांची पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका

mp pratibha dhanorkar गुरू गुरनुले मूल :- बल्लारपूर विधानसभा ही क्षेत्राचे आमदार राज्याचे वनमंत्री असताना सुदधा तालुक्यातील समस्या सुटलेल्या नाही. ठेकेदाराचे काम देताना सुद्धा भेदभाव करतात. म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांना मतदारांनी नाकारले. आणि ही गर्दी पाहून आताही विधानसभेमध्ये मतदार नाकारतील. असे मत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केले.

image

गांधी चौक मुल येथे तालुका कॉंग्रेस पक्षातर्फे महिला कांग्रेस तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत हौत्या. वनांच्या संदर्भात अनेक समस्या उदभवल्या असताना वनमंत्री त्यावर कोणत्याच उपाय योजना आखताना दिसत नाही, अशी टिका त्यांनी यावेळी केली. वाघ व रान डुकरे यांच्या रोजच्या हल्ल्यामुळे शेतकरी , शेतमजूर आणि गुराख्यां मध्ये भितीचे निर्माण झाली आहे. शेतकरी शेती करणे सोडत आहेत ही भिती दूर करण्याची नैतिक जबाबदारी पालक मंत्र्यांची आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याबाबत वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक बोलावून यावर तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.जिल्हयात सुडबुदधीचे राजकारण केल्या जात असल्याने क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या हक्काचा आमदार आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राजकारण : हजारो युवकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

लोकसभेचे क्षेत्र मोठे असल्याने या क्षेत्राच्या विकास कामांसाठी केंद्र शासनाने प्रत्येक खासदाराचा निधी तीस कोटी वाढवून दयावा ,अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही,असा शब्दही दिला.मतदारांनी आपल्या कडे हक्काने आपले प्रश्न मांडावेत असेही त्या म्हणाल्या.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे .प्रमूख पाहूणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, वी.परिषदेचे आ.अभिजीत वंजारी, माजी आ.देवराव भांडेकर, मा.न.प.अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश मारकवार, डॉ.अभिलाषा गावतूरे,सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, जिल्हा कांग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनूले, राजू पाटील मारकवार, संचालक किशोर घडसे, महिला अध्यक्ष रूपाली संतोषवार, माजी.जीप.सदस्य मंगला आत्राम, लीना फुलझेले, उपस्थित होते.

गोळीबार : गोळीबार प्रकरणी राजकीय पदाधिकाऱ्याला अटक

मतदार संघाचा इतिहास प्रास्तविकामधून तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मांडला. यावेळी संतोषसिंह रावत यांनी निधी अभावी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास ठप्प आहे. अशा ग्रामपंचायतींना न्याय देण्याची मागणी केली.रोज होणारे मानव वन्यजीव संघर्ष,धनगरांचा चराईचा निस्तारहक्क, वन जमीन पटटे, रानडुक्करांमुळे होणारे शेतपीकांचे नुकसान याबाबत आपण न्याय मिळऊन देण्यासाठी प्रयत्न करावे. असे मत संतोष सिंह रावत यांनी खासदारांपुढे व्यक्त केले.

Mp pratibha dhanorkar यावेळी आ.अभिजीत वंजारी यांनीही परखड शब्दात मनोगत व्यक्त केले. राज्यात मविआचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना आम्ही बंद करणार नाही.उलट तीन हजारांऐवजी पाच हजार रूपये प्रत्येकी देवू अशी ग्वाही आ.सुभाष धोटे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी ,तर आभार महिला शहर अध्यक्ष नलिनी आडेपवार यानी मानले. सभेला मविआ घटक पक्षाचे पदाधिकारी, यांचेसह हजारच्या वर नागरिक उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे संदीप मोहबे,प्रशांत उराडे,अतुल गोवर्धन,विष्णू सादमवर कैलाश चलाख, शामला बेलसरे,समता बंसोड,सीमा भसारकर, यांनी सहकार्य केले. सात युवकांचा कांग्रेस मध्ये प्रवेश काँग्रेसची पुढची वाटचाल पाहून संतोषसिंह रावत यांचे नेतृत्व मानून अनंत लेनगुरे, शेंडे, काळंबंधे, बावनथडे, यांचे सोबत अनेक युवकांनी गळ्यात कांग्रेस दूपट्टा टाकून प्रवेश केला नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांचे ग्रामीण सरपंच,सोसायटी अध्यक्ष,संचालक,ग्राम काँग्रेसचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!