woman safety message कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती, या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पडले, या अमानुष घटनेनंतर देशभरातील आई-वडिलांना एकच प्रश्न पडला की आता आपण मुलींची सुरक्षा करायची कशी? अश्या घटनेतील आरोपीना आता ठेचायला हवे अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक देत आहे.
अवश्य वाचा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर
woman safety message चंद्रपूर शहरात या घटनेचा अनेक सामाजिक संघटनांनी निषेध दर्शविला, पण आता चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी शहरात मध्यरात्री शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
जागृती मशाल मंचाची संकल्पना कलकत्ता येथील घटनेनंतर आकारात आली.
महत्वाचे : राखी च्या भरवश्यावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा, डॉक्टर बहिणीने दिला अनोखा संदेश
विशेष म्हणजे या रॅलीत कुणाचाही विरोध होणार नाही तर स्त्री सुरक्षेची शपथ यामध्ये घेतल्या जाणार आहे.
पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः या रॅली मध्ये सहभाग घेणार आहे.
आज 20 ऑगस्टला याबाबत जागृती मशाल मंचतर्फे पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी माहिती दिली.
31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत ही रॅली गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
गोस्वामी पुढे म्हणाल्या की या रॅली चा एकच उद्देश्य आहे प्रत्येक महिलांच्या सुरक्षेची जबाबदार आपण सर्वांची आहे, महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांबद्दल जागरूकता पसरविणे.
नागरिकांनी आता एकजूट व्हायला हवे, चंद्रपुरातील नागरिक महिला सुरक्षेच्या समर्थनात एकत्र आहे हे दाखवीत प्रत्येक महिला आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हे मानणे.
संघटित व असंघटित क्षेत्रात कण करणाऱ्या प्रत्येक महिला, रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे याची सार्वजनिक हमी देणे, संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, भीतीशिवाय महिकाना स्वतंत्र फिरण्याचा अधिकार असला पाहिजे.
या पार्श्वभूमीवर सदर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
‘तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहो” हा नारा सर्व चंद्रपूर वासी देणार आहे, तुमची सुरक्षा आमची जबाबदारी हे मुली व स्त्रियांना आश्वासित करण्याचा एक उद्देश्य आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत एड प्रीतिशा साधना, अश्विनी खोब्रागडे, डॉ.नसरीन मावाणी आदि उपस्थित होते.