chandrapur police : पळण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या 2 शिक्षकांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक

chandrapur police राज्यात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, एकीकडे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मध्यरात्री जागृती मशाल मंच मशाल रॅली काढत आहे.

Chandrapur police तर दुसरीकडे विविध कार्यक्षेत्रात कार्य करणारे महिला व मुलीच्या अब्रूवर उठण्याचा प्रयत्न करीत आहे, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडला, शिक्षकांचा वाढदिवस होता, मुलींनी गुरू चा मान असलेल्या शिक्षकाला पार्टी मागितली तर शिक्षक व त्याच्या शिक्षक मित्राने त्यांना आपल्या रूम वर बोलाविले.

अवश्य वाचा : मला मिठी दे, शिक्षकाची विद्यार्थिनीला मागणी

शिक्षक म्हणजेच आपले गुरू अशी मनात भावना ठेवत विद्यार्थिनी त्यांच्या रूम वर गेल्या आज माझा वाढदिवस आहे तर मला रिटर्न गिफ्ट हवे असे शिक्षकाने त्या विद्यार्थिनीला म्हटले तर आपल्याला काय गिफ्ट हवे सर असे विचारताच शिक्षक म्हणाला की मला मिठी दे, विद्यार्थिनीने नकार दिल्यावर शिक्षकाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तावडीतून विद्यार्थिनी निसटल्या याबाबत त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला असता कुटुंबीयांनी तात्काळ वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Chandrapur police तक्रार दाखल झाल्याची माहिती शिक्षकांना मिळताच ते दोघेही पसार झाले, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे जबाबदारी दिली. कोंडावार यांनी तात्काळ पथक पाचारण करीत पळण्याच्या तयारीत असणार्या त्या दोन्ही शिक्षकांना रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली.

आई वडील नंतर महत्वाचे स्थान हे शिक्षकाला असते मात्र वरोरा येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने केलेला हा प्रकार त्यांच्या शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा आहे, यावर विद्यार्थिनींच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून आरोपी शिक्षकांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!