shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली.

योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार

घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखा येथे आत्मसर्पण केले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
विशेष म्हणजे जुलै महिन्यात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहे.

घटना काय?

Shootout दुपारच्या सुमारास हाजी व त्याचे सहकारी बिर्याणी खाण्यासाठी हॉटेल शाही दरबार येथे दाखल झाले, मात्र काही वेळाने त्यांच्यावर पाळत ठेवून असणारे युवक तिथे दाखल झाले आणि हाजीवर गोळीबार केला या गोळीबारात हाजी चा सहकारी शिवा यांच्या पायाला गोळी लागली, 2 गोळ्या हाजी वर झाडण्यात आल्या, त्यानंतर हाजीवर चाकू हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात हाजी सरवर शेख चा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रामनगर व स्थानिक गुन्हे शाखा त्याठिकाणी दाखल झाली, 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले असून यामध्ये मुख्य आरोपी म्हणून समीर हे नाव पुढे आले आहे.

आमदार जोरगेवार यांनी पोलीस यंत्रणेवर उपस्थित केले होते प्रश्नचिन्ह

जुलै महिन्यात लागोपाठ 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, पोलीस प्रशासनाने पहिल्या घटनेनंतर कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, जोरगेवार यांनी पोलीस विभागाला धारेवर धरल्यावर थातुरमातुर कारवाई केली मात्र ठोस कारवाई झाली नाही.

आरोपी व मृतक हे दोघेही आधी मित्र होते, त्यांनतर दोघांनी मिळून गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं, मात्र या क्षेत्रात एकच वाघ असतो त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्वातून ही घटना घडली अशी माहिती पुढे आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!