ladki bahin bank kyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला, जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये महिपाच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र अजूनही लाखो बहिणीला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू
कारण महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही, केवायसी झालेली नाही.
त्यामुळे हजारो महिला रोज बँकेत जात केवायसी साठी रांगा लावत आहे.
रक्षा बंधनाच्या पूर्वी खात्यात बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असा शब्द सरकारने दिला मात्र ऐन रक्षाबंधनाला बहिणी बँकेच्या बाहेर उभ्या आहे.
राजकारण : चंद्रपुरातील रस्ते खड्डेमुक्त करा – सुधीर मुनगंटीवार
Ladki bahin bank kyc बँक खात्यात पैसे न आल्यामुळे लाडकी बहीण केवायसी च्या फेऱ्यात अडकली आहे. मोठ्या प्रमाणात माहिला बँकेत केवायसी करण्यासाठी येत असल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा हैराण झाले आहे.
बँकेने मुख्यमंत्री शिंदे यांना केली सुरक्षेची मागणी
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
असा करा अर्ज
शासनाने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीद्वारे लाभार्थी अर्ज करू शकतात, ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास त्या महिला ऑफलाईन अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्याकडे करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत हे अँप व ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र याठिकाणी जावून लाभार्थी महिला आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात.
आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे जाणून घेऊ या…
सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया. हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar
आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल.
त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार तो टाका.
ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात.
आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.