Fatal potholes चंद्रपूर शहरातील जीवघेणा मार्ग म्हणजे बागला चौक ते लालपेठ, या मार्गावर जगात कुठेही नसलेले खड्डे तयार झाले आहे, त्या खड्ड्यातून नागरिक आपली वाट काढतात, विशेष बाब म्हणजे दुहेरी मार्ग असलेल्या या रस्त्यावर फक्त 100 मीटर रस्ता तयार झाला आणि उर्वरित रस्ता निधी अभावी रखडला.
या मार्गावर चंद्रपूर गडचिरोली विभागाचे महावितरण कार्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, मात्र त्यानंतर सुद्धा प्रशासन व जनप्रतिनिधी झोपल्याचे सोंग करून आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील रस्त्यावर खड्डयासोबत काढा सेल्फी, आणि मिळवा रोख बक्षिसे
Fatal potholes 10 ऑगस्टला रात्री mh34 d 7491 हा ऑटोरिक्षा लालपेठ कडे जात होता, ऑटो मध्ये 3 ते 4 प्रवासी होते, महावितरण कार्यालय पर्यंत रस्ता बरा असल्याने ऑटो व्यवस्थित जात होता मात्र अर्धवट मार्ग संपल्यावर ऑटो जीवघेण्या खड्ड्यात फसला व ऑटोचे चिमटा तुटला, यामुळे ऑटो चा पुढील भाग खड्ड्यात अडकला, या खड्डेमय अपघातात प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली.
ऑटो रिक्षा चालकाने सरळ मनपा व जनप्रतिनिधी यांच्यावर आरोप करीत लालपेठ व बाबूपेठ भागात जनावरे राहतात काय? असा प्रश्न उपस्थित करीत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली.
महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर
चंद्रपूर शहरातील लालपेठ व बल्लारपूर येथे जाणाऱ्या ह्या मार्गावर रोज हजारो वाहने जातात मात्र जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते.
मागील 3 ते 4 वर्षांपासून हा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला असून पावसाळ्यात रस्त्यावर फक्त पाणी दिसते, सदर मार्गावरील रस्ता जणू चोरीला गेला की काय अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. या मार्गावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा प्रवास केला मात्र या खड्ड्यांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.