Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी

raj thackeray 22 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपुरातील ND हॉटेलमध्ये दाखल झाले होते, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची बैठकीत चाचपणी केली व चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातून स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरच्या उमेदवारांचे नाव जाहीर होताच बोरकर विरुद्ध भोयर समर्थक आपसात भिडले. यामुळे पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.

अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाची दावेदारी

राज्यातील विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढविणार अशी घोषणा मनसे प्रमुख ठाकरे यांनी केली होती, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहे, मराठवाडा दौरा आटोपल्यावर ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, आज राज ठाकरे चंद्रपुरात दाखल झाले होते, जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी चंद्रपूर व राजुरा विधानसभा मनसे लढविणार अशी घोषणा ठाकरे यांनी बैठकीत केली.

Raj thackeray चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून चंद्रपूर शहर मनसे अध्यक्ष सचिन भोयर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, बैठक आटोपताच राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडताच भोयर समर्थक व बोरकर समर्थक आपसात भिडले.

अवश्य वाचा : पाण्याचा उपसा करणार तर चंद्रपूर शहरातील नागरिक जाणार काळ्या यादीत

राजुरा विधानसभा क्षेत्रातून चंद्रप्रकाश बोरकर इच्छुक होते मात्र ऐनवेळी सचिन भोयर यांनी बाजी मारली, बोरकर हे कोरपना तालुक्यातील नांदा ग्राम पंचायत चे सदस्य आहे, त्याठिकाणी बोरकर यांचे चांगले वर्चस्व आहे, त्यांनी मनसे पक्ष त्याठिकाणी वाढविला मात्र ऐनवेळी बाहेरच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यावर कार्यकर्ते नाराज झाले.

प्रत्येक वेळी स्थानिकांचा मुद्दा राज ठाकरे उपस्थित करतात मात्र आज त्यांनी स्थानिकांना डावलून बाहेरच्याला उमेदवारी दिली ही बाब कार्यकर्त्यांच्या पचनी न पडल्यामुळे आज हा राडा झाला.

मनसे हाणामारी

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक परिस्थिती बरोबर नसली तरी मनसे प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत या निमित्ताने मोठा डाव खेळला आहे, या पूर्वी चंद्रपूर विधानसभेत मनसे उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, राजुरा विधानसभेत सुद्धा तेच हाल झाले होते, मात्र यंदा च्या निवडणुकीत काय होणार ही येणारी वेळ सांगेल. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत चुरस बघायला मिळणार हे नक्की.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!