tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले.
अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांडात पुन्हा 7 आरोपीना अटक, राजकीय कनेक्शन पुढे येणार?
Tiger attack ही घटना सायंकाळी ५-३० च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, व वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली(प्रादेशिक) प्रियंका वेलमे यांना मिळताच त्यांनी दिलेल्या आदेशान्वये क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के व वनरक्षक सुधीर ठाकूर, राकेश गुरनुले, संजीवनी पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झीरे व त्यांची टीम सकाळी ६-०० वाजता यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता सदर इसमाचा मृतदेह सापडला.
घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सांगितले. गुराखी मुनिम गोलावार याला पत्नी दोन लहान मेले असा परिवार असून कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंब निराधार झाला. पुढील तपास मुल पोलिस व वनविभाग करीत आहे.
मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, वाघाचे हल्ले या भागात आता नियमित वाढत आहे, काही दिवसांपूर्वी वनविभागाने नागरिकांना मानव वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती करण्याचे काम केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा असे हल्ले वाढणे ही चिंताजनक बाब आहे.
कसा उदभवतो हा संघर्ष?
- अधिवासाचे नुकसान: मानवी लोकसंख्या वाढत असताना आणि शहरी भागांचा विस्तार होत असताना, नैसर्गिक अधिवास अभूतपूर्व दराने नष्ट होत आहेत. अधिवासाची ही हानी प्राण्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये जाण्यास भाग पाडत आहे, ज्यामुळे अनेकदा मानवांशी संघर्ष होतो.
- हवामान बदल: जसजसे तापमान वाढते, पाण्याचे स्त्रोत कोरडे होतात आणि अन्न कमी होते, प्राण्यांना संसाधनांच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पुढे जाण्यास भाग पाडले जाते. हे त्यांना मानवांच्या जवळच्या संपर्कात आणते, संघर्षाची शक्यता वाढवते.
- मानवी अतिक्रमण: लोक पूर्वीच्या अविकसित भागात जात असताना, ते पर्यावरणातील नैसर्गिक समतोल बिघडवतात, अनेकदा प्राण्यांना स्थलांतर करण्यास किंवा नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास भाग पाडतात. शेती, जंगलतोड, अत्याधिक चराई, शिकार इत्यादीमुळे मानवी हस्तक्षेप वाढला आहे. प्राणी त्यांच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करत असल्याने यामुळे संघर्ष होऊ शकतो.