Tiger Attack : केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष हे 9 ऑगस्टला वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही माहिती शुक्रवारी सायंकाळी उशीरा मीळाल्याने आणि गुराखी घरी न आल्यामुळे आज सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला.वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

योजना : लाडकी बहीण योजना यादी जाहीर


Tiger attack मृतक गुराखी लक्ष्मण मराठे याच्या पत्नीला प्रियंका आर.वेलमे , वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादेशिक) यांचे हस्ते ३००००/- (तीस हजार) रूपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली.यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था,मूल एम.आर.वाघमारे वनरक्षक सांडाळा,आर.जे.गुरनुले वनरक्षक जानाळा, शितल बेंदले वनरक्षक सुशी, स्वप्नील आक्केवार व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.

मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यामध्ये ग्रामीण भागात अनेक नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेला आहे त्यानंतर सुद्धा ह्या घटना नियंत्रीत करण्यास वनविभाग अपयशी ठरले आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात हवाई सेवा सुरू होणार

या घटना न व्हाव्या यासाठी वनविभागाच्या वतीने ग्रामीण भागात नुकतेच मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळू शकतो याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. वाघांची संख्या जिल्ह्यात वाढली असल्याने त्यांच्या अधिवसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ह्या घटनेत सध्या वाढ होताना दिसत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!