crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला करीत हत्या केली.
हाजी ची हत्या केल्यावर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले, पोलिसांनी आरोपिकडून 4 देशी बनावटीची बंदूक व चाकू जप्त केला.

कोलकाता डॉक्टर अत्याचार : चंद्रपुरात निघाला डॉक्टरांचा मोर्चा


Crime हाजी ची हत्या जुन्या संघर्षातून केली असल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली, आरोपीमध्ये दिग्रस येथील समीर शेख सह असे एकूण 6 आरोपीला अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी समीर शेख हा एक दिवसांपूर्वी आपल्या सहकाऱ्यासोबत चंद्रपुरात आला होता, त्यांनी हाजी ची रेकी करीत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
आरोपी हाजी वर हल्ला करताना अक्षरशः तुटून पडले होते, तो जिवंत राहू नये यासाठी चाकूने सपासप वार केले.

खाकी चा वचक कमी झाला?


Crime मागील 40 दिवसात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार व बॉम्ब हल्ल्याच्या घटना घडल्या, पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही.
विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागताच 2 ते 3 महिने जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद होते, मात्र त्यानंतर सर्व अवैध धंदे पुन्हा सुरू झाले, सुगंधित तंबाखू तस्करी, अवैध कोळसा, सट्टा, देशी बंदुक व काडतुसे चा व्यापार अश्या अनेक अवैध धंद्याना उत का बरं आला? हा मोठा प्रश्न आहे.

योजना : लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा

स्थानिक गुन्हे शाखा गुन्हेगारीवर वचक ठेवण्यास अपयशी?

जिल्ह्यातील गुन्हे, अवैध धंदे यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात घडणारे मोठे गुन्हे, बंदूक, काडतुसे यांची वाहतूक याबाबत यंत्रणा काय करीत आहे असे प्रश्न सध्या जनसामान्यांद्वारे विचारण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीची दखल गृह विभागाने घेतली असून चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असून काही वरिष्ठ अधिकारी यांची बदली होणार असे संकेत गृह विभागाने दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 40 दिवसात गोळीबार, 40 काडतुसे, पेट्रोल बॉम्ब, बनावट बॉम्ब, बंदुका जप्त अश्या घटना घडल्या, बंदूक सारखी वस्तू जेव्हा जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी पोलिसांच्या यंत्रणेला कसलाही थांगपत्ता का लागला नाही?

आधीचं चंद्रपूर

पूर्वी चंद्रपूर पोलीस दररोज रात्री पेट्रोलिंग करायची, रात्री कुणी फिरताना दिसलं की पोलीस त्याला त्याचे नाव, नंबर कुठून आला, कुठे जात आहे? याबाबत शहानिशा करायची, रात्रीचे 10.30 वाजले की पोलिसांचे वाहन दुकानदाराला दुकान लवकर बंद करा असे निर्देश द्यायचे.

आता रात्री विविध चौकात वाढदिवसाचे केक कापल्या जातात, त्याठिकाणी हुडदंग घालण्यात येतो, अनेजजन रात्री बेरात्री शहरात बिनधास्त फिरत असतात, कुणीही त्यांना थांबवित नाही, तो कदाचित गुन्हेगार सुद्धा असू शकतो, शहरात असे काही ठिकाण आहे जे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतात, त्याठिकाणी काही कुख्यात गुन्हेगार आपले ठाण मांडून बसून असतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!