protect yourself गडचांदूर – कलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्टच्या मध्यरात्री डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन हत्या झाली.या क्रूर घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
राजकारण – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका
Protect yourself चंद्रपूरतील एका महिला डॉक्टरने कलकत्ता येथील घटनेचा निषेध नोंदवितानाच केवळ राखीच्या भरवश्यावर राहू नका,स्वताची सुरक्षा स्वतः करा अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गाच्या मध्यभागी उभ्या झालेल्या या महिला डॉक्टरने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.हिना झाडे असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे. गडचांदूर शहरात त्याचे खाजगी क्लिनिक आहे.त्यांचे फोटो, विडिओ समाज माध्यमात वायरलं झाले आहेत.
रक्षाबंधन : दिव्यांग बहिणींनी आमदार जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशमाचा धागा
आज रक्षाबंधनाच्या सणनिमित्त आपल्या लाडक्या भावाला ओवाळणी करण्यात बहीण व्यस्त असताना चंद्रपूर जिल्हातील गडचांदुर येथील डॉक्टर बहीण मात्र अत्याचाराची बळी ठरलेल्या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गावर उभी होती. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीसाठी पवित्र सण. संकटात सापडलेल्या बहिणीची रक्षा करायला भाऊ धावून येईल अशी आशा प्रत्येकच बहिणीला असते. मात्र या डॉक्टर महिलेने केवळ राखीच्या भरोशावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा असा संदेश दिला आहे.
संदेश फलकावर काय लिहिलं…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…
निव्वळ राखीच्या भरोशावर नका राहू, माता बहिणींनो. स्वतःची रक्षा स्वतः करा. कारण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल ना तेव्हा गुन्हेगार बाहेर फिरणार आणि दोषी तुम्हाला ठरवल्या जाणार.
कलकत्ता बलात्कार घटनेनंतर देशात संताप व्यक्त होत आहे, आज पाल्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं अशी आई-वडिलांची इच्छा असते मात्र अश्या घटना उजेडात आल्यावर मुलांना शिक्षणासाठी बाहेर कस पाठविणार असा प्रश्न पालकांच्या डोळ्यासमक्ष उभा झाला आहे.
लाडकी बहीण : जिल्ह्यातील लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात
आता पालकांनी शिक्षणासहित आत्मरक्षणाचे धडे द्यायला हवे, असा प्रसंग ज्यावेळी ओढवितो तेव्हा आपण काय करायला हवं? याबाबत आई-वडिलांनी मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे, आता या क्रूर वृत्तीला ठेचंण्याची वेळ आली आहे, जिल्ह्यातील डॉ.हिना झाडे देवाळकर यांनी आजच्या कृतीमागून मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशातील प्रत्येक महिला व मुलींना जागरूक करण्याची वेळ आली आहे.
![image](https://news34.in/wp-content/uploads/2024/08/image-961x1024.webp)