Doctors Strike : चंद्रपुरात डॉक्टरांचा मोर्चा

doctors strike कलकत्त्याच्या आर जी कॉलेजमध्ये झालेला बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर्स आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्त्याच्या आर जी कार मेडिकल कॉलेज येथे एका निवासी महिला डॉक्टरचा नृसंश बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्या प्रकरणाच्या तपासामध्ये खूप अनियमितता आढळून येत आहे आणि प्रशासनाकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने आणि पीडित परिवाराने केलेला आहे.

या निर्घुन प्रकाराचे पडसाद देशभरामध्ये दिसून येत आहेत आणि देशभरामधील मेडिकल कॉलेजेस चे निवासी डॉक्टर्स आणि विद्यार्थी या विरोधामध्ये संतप्त निदर्शने करीत आहेत आणि संपावर सुद्धा गेलेले आहेत निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षापासून एरणीवर आलेला आहे पण सरकारकडून आणि प्रशासनाकडून या बाबतीमध्ये कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.


निवासी डॉक्टरांच्या कामांच्या तासांबाबत असो अपुऱ्या स्टाफ अभावी असो निवासी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागत आहे दोशींना लवकरात लवकर फास्टट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात यावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा कायदा कठोरपणे अमलात आणल्या जावा.

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार किशोर जोरगेवार


Doctors strike या मागणीसाठी आज शेकडोंच्या संख्येने चंद्रपूर येथील निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते बेटी बचाव आणि बेटी पढाव चा नारा देणाऱ्या सरकारच्या राज्यामध्ये बेटीवरील अन्याय अत्याचार आजही थांबलेले नाहीत जर दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर देशभरामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी डॉक्टरांनी दिला.
सदर मोर्चा चंद्रपूर मेडिकल कॉलेज ते गांधी चौक मुख्य रस्त्यावरून निघाला होता.

यावेळी मार्ड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अक्षय वाघमारे, चंद्रपूर कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे सर चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अभिलाषा गावतुरे ,डॉक्टर राकेश गावतुरे, आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे, प्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉक्टर विवेक बांबोडे, डॉक्टर प्रीती बांबोडे, डॉक्टर राम भारत डॉक्टर पल्लवी डोंगरे, डॉक्टर अनुप पालीवाल, डॉक्टर प्रीती उराडे, डॉक्टर विद्या राणे, डॉक्टर समृद्धी वासनिक, डॉक्टर सुमेद राणावत,डॉक्टर प्रणय गांधी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!