Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

Mahila Suraksha कलकत्ता येथील मेडीकल कॉलेज मध्ये घडलेली घटना निंदनिय असून आरोपींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा गृह मंत्री अमित शाह यांचे कडे केली आहे.

अवश्य वाचा : आता आपण ही बनू शकता व्यावसायिक पायलट, चंद्रपुरात होणार प्रशिक्षण

Mahila suraksha कलकत्ता येथील घटना मन हेलावणारी असून या घटनेचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. या घटनेच्या संदर्भाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यासाठी प्रत्येक राज्याने देखील प्रयत्न केला पाहिजे. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री जे.पी. नढ्ढा यांना प्रत्र लिहून आरोग्य यंत्रणेला सुरक्षा प्रदान करुन आरोपींना देखील कडक सजा व्हावी अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.


महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे परंतु त्या जर सुरक्षी राहील्या नाही. तर देशात अराजकता निर्माण होईल. याकरीता प्रत्येक राज्यातील सरकार ने देखील तसेच सरकार ने देखील महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करावेत, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षेसंदर्भात शक्ती कायदा लागू करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार असतांना विधानसभेत मागणी केली होती. वरील प्रकरणी केंद्र सरकार ने दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धनोरकर यानी केली आहे.

कलकत्ता येथील प्रकरण काय?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. अशातच या महविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

पोलीसांनी एकच आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. रॉय हा एक 33 वर्षीय सिव्हिक वॉलंटियर असून त्याला हॉस्पिटलच्या विविध विभागात प्रवेश होता. पोलिसांनी त्याच्याकडून ब्लूटूथ इयरफोनचा तुकडा जप्त केला. CCTV फूटेजच्या आधारावर आरोपीला ओळखण्यात आले. संजय रॉयला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे. त्याला बलात्कार आणि हत्या या कलमानुसार आरोपित केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!