chandrapur rular गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष यांना आठ दिवसापूर्वी वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले.
गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार, कुख्यात गुन्हेगार हाजी ची हत्या
Chandrapur rular याबाबत राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन हल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांची पत्नी श्रीमती पूर्णाबाई मराठे यांना दिनांक १२/८/ २०२४ रोजी शासनाच्या वतीने १० लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला.
याप्रसंगी चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, चीचपल्ली वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, नंदू रणदिवे व वन कर्मचारी उपस्थित होते. झालेली घटना अशी की, गाई बैल चरायला नेणारा गुराखी रात्री पर्यंत घरी न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला होता. ही घटना माहीत होताच विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी केळझर येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
महत्त्वाचे : शेतात रोवणी करीत असताना महिलांसमोर आला मोठा अजगर, आणि घडलं असं
तसेच वनविभाग व पोलीस प्रशासनाने आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेश झिरे व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सी वनरक्षक यांनीही तात्काळ दखल घेऊन वनविभागाच्या वतीने सहकार्य केले व तसा अहवाल शासनाकडे तात्काळ पाठविण्यात आला होता.