Bjp Grand Convention चंद्रपूर शहरात 4 ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, त्याबाबत एनडी हॉटेल येथे 2 ऑगस्टला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
राजकीय : चंद्रपूर जिल्ह्यात येणार 20 फायर फायटर बाईक्स
Bjp grand convention आयोजित पत्रकार परिषदेत भाजप ग्रामिण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, मंगेश गुलवाडे, संध्याताई गुरनुले, किरण बुटले, ब्रिजभूषण पाझारे व राजू गोलीबार उपस्थित होते.
महत्त्वाचे : 10 वर्षानंतर सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अपूर्ण
4 ऑगस्टला शकुंतला लॉन येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदर अधिवेशन चालणार आहे, या अधिवेशनात मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार मदन येरावार, प्रवीण दटके, सोबतच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किर्तीकुमार भांगडीया, चंदनसिंग चंदेल आदि उपस्थित राहणार आहे.
भाजपच्या या महाअधिवेशनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याने नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन ठराव घेण्यात येणार आहे.सोबतच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी मोहीम याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
आयोजित अधिवेशनात भाजप सदस्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.
भाजपचा लोकसभेत पराभव
लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव मोठ्या फरकाने झाला, त्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपचे अधिवेशन होत आहे, या अधिवेशनात पराभवावर चिंतन केलं जाणार असल्याची माहिती आहे, पंतप्रधान मोदी यांचा अभिनंदन ठराव व सरकारच्या विविध योजनांची माहिती सुद्धा कार्यकर्ते व सदस्यांना देण्यात येणार आहे. आयोजित अधिवेशनात भाजपचे वरीष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.