Char dham yatra आजची तरुणाई भरकट चाललेली आहे ,नशेच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आरोग्य खराब करत आहे, म्हणजेच तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे असे सगळे आरोप एका बाजूला होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पौंभुर्णा तालुक्यामध्ये राहणारा घनोटी या छोट्या गावातील 23 वर्षीय मयूर देऊरमले यांनी 18000 किलोमीटर सायकलने प्रवास करून बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा पूर्ण करून पाच महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम स्थापित केला.
महत्त्वाचे : पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी करून दिली वाहतूक नियमांची आठवण
Char dham yatra चंद्रपूर येथे स्थानिक वरोरा नाका चौक मध्ये तो आला असता त्या ठिकाणी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, जीवन ज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे व त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचे स्वागत व सत्कार केले.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात लवकर सुरू होणार हवाई सेवा
डॉक्टर विश्वास झाडे भारतातल्या लद्दाख, मुंबई , हैद्राबाद, गोवा,बंगलोर, नागपूर व इतर अनेक मध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले होते, तसेच चंद्रपुरातील पहिले आयरन मॅन म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना शारीरिक खेळात आवड आहेच हे दिसून येते. खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ होते असे त्यांनी म्हटले आहे. मयूरचा हा सायकल प्रवास नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरेल, असे डॉक्टर विश्वास झाडे यांनी सांगितले.. त्यांचा सोबत सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर, प्राध्यापक श्याम हेडाऊ, झी मीडियाचे आशीष अंबाडे, सामाजिक कार्यकर्ते अमर रामटेके, दिक्षांत बेले व उपस्थित मित्रपरिवराने त्याचे स्वागत केले.