Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

landslide चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 1 ऑगस्टला खळबळजनक घटना घडली, शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील एका घरात भुस्खलन झालं, घरात 20 ते 25 फुटाचा खड्डा पडला, त्या खड्ड्यात महिला व एक कुत्रा पडल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.

Landslide रयतवारी कॉलरी परिसरातील आमटे ले आऊट येथे राहणारे शिवणकर कुटुंब बाहेरगावी गेले होते, 2 दिवसांनी म्हणजेच 1 ऑगस्टला ते घरी आले, घराचे दार उघडताच त्या खड्ड्यात महिला कोसळली.

त्यानंतर सदर बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली तो पर्यंत त्या खड्ड्यात सीडी लावत महिलेला बाहेर काढण्यात आले, पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

राजकीय – खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे

मागील 10 दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी मुळे सदर घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या संपूर्ण घर खाली करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चे अधिकारी, पोलीस अधिकारी व आमदार त्याठिकाणी दाखल होत नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

घटनेचे कारण काय?

चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीने वेढलेला आहे, जिल्ह्यात विविध भागांत कोळसा खाणी आहे, विशेष बाब म्हणजे ज्याठिकाणी ही घटना घडली ती सुद्धा वेकोलीच्या बंद असलेल्या रयतवारी कोळसा खाणी जवळील भागात आहे.

Wcl द्वारे अंडर ग्राउंड कोळसा खाणीमधून कोळसा बाहेर काढल्यावर त्याठिकाणी माती टाकावी लागते मात्र तसे होत नाही, आवश्यकतेनुसार तशी प्रक्रिया केल्या जात नाही त्यामुळे अशी घटना घडली. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात वेकोली च्या खाणी बंद अवस्थेत आहे, त्याठिकाणी काहीजण फायदा घेत वेकोलीच्या जागेची विक्री करतात, अवैधरित्या अश्या विक्री होत असल्याने वेकोली मात्र झोपेचं सोंग घेऊन राहते, लालपेठ भागात खाणीचा विस्तार सुरू आहे मात्र अजूनही त्या भागातील नागरिकांना हटविण्यात आले नाही, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा जैसे थे आहे.

महत्त्वाचे : पत्रकारांच्या मुलाचा लंडनमध्ये सन्मान

Landslide चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक शहरात 26 ऑगस्ट 2022 रोजी आमराई वार्डात अशाच प्रकारे एक घर अशाच घटनेत तब्बल 70 फूट खाली खचले होते. कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजविल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात. आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे तज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरमालक सुरेश शिवणकर यांनी प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

आमदार पोहचले घटनास्थळी

चंद्रपूर रय्यतवारी कॉलरी भागात अचानक भूस्खलन झाल्याने एका कुटुंबावर संकट कोसळले आहे. दोन दिवस बाहेरगावी राहून घरी परतलेल्या शिवणकर कुटुंबाच्या घरात २० फूट खोल खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.
    यावेळी तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, रामनगर ठाणेदार सुनिल गाडे,अजय जैस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रकात बातव आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

योजना : लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा करा एडिट


   घरातील सुनिता नामक महिला  दरवाजा उघडताच अचानक खड्ड्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ मदत करत शिडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, शिवणकर कुटुंबावर ही घटना अत्यंत भीषण असल्याने त्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली.
  गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.   घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.
शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोलि वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने पिडीत कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही सूचना आमदारांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!