mahavikas aghadi कलकत्ता, बदलापूर व नागभीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणविरोधात आज चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फित लावत गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद हा नियमबाह्य असल्याचे सांगितले.
संतापजनक : मनोरुग्ण महिलेवर चंद्रपूर जिल्ह्यात सामूहिक अत्याचार
देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे, यावर राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आली.
Mahavikas Aghadi आयोजित निषेध आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार गट दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, शिवसेनेचे प्रमोद पाटील, कुसुमताई उदार, सुनीता लोढिया, संगीता अमृतकर उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली की देशात व राज्यात महिला अत्याचार सतत वाढत आहे याबाबत मविआ ने बंद पुकारला होता मात्र न्यायालयाने बंद नियमबाह्य असल्याचे म्हटले होते, शरद पवार यांनी संविधानाचा आदर करीत तोंडाला काळ्या फिति लावत निषेध आंदोलन करण्याचे सांगितले, त्यामुळे आम्ही संविधानाचा आदर करीत आंदोलन करीत आहो. राज्यात घडलेल्या या घटना संतापजनक आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा.
आमदार सुभाष धोटे म्हणाले की 23 ऑगस्टला हिंदू समाजाच्या मोर्च्यात पालकमंत्री व स्थानिक आमदार उपस्थित होते त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, यावर आम्ही त्यांचा निषेध करतो.
आयोजित निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.