Mahesh Mendhe : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महेश मेंढे

mahesh mendhe नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून  शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश देण्यात आल्यानंतरही यंत्रणेला जाग आली नसून शेतकरी संकटात सापडला आहे.   या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणीसाठी बांधावर पोहचले आहे.

अपघातग्रस्त युवक-युवतीच्या मदतीला धावले आमदार

 Mahesh mendhe अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी मदतीचा हाथ हा थांबला नसून त्यांनी आत्ता आपला मोर्चा शेतकऱ्याकडे वाढविला आहे. त्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे सुरु आहे.  मागील जुलै महिण्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुन धरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत.अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.तसेच काही पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहुन महेश मेंढे यांनी पुढाकार घेतला व शेतकरी वर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा बांधावर जाऊन त्यांची विचारणा केली. त्यांना मदत करू असे मानत त्यांना सहानभूती दिली.  

पावसाचे दिवस असल्याने त्यांना शेतात काम करताना अडचण होत असल्याने त्यांना त्यापासून संरक्षण करण्याचे उद्देश्याने छत्रीचे वाटप केले.

 यावेळी उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम ,सचिन रणवीर, समीर सोनवणे, अथर्व फुलझेले, सर्वेश पिसे, मीनल गुरव , राजेश पिंपळकर , विनय देठे,  पियुष धुपे यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!