karate competition ऑलम्पिक स्पर्धेत देशाने निराशाजनक कामगिरी केली असली तरी चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील 13 वर्षीय माहिन ने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. माहिन च्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
karate competition अवश्य वाचा : चंद्रपुरातील गुन्हेगारी पोलिसांवर भारी
karate competition बारामती येथे 10 ते 11 ऑगस्टला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धा युगेंद्र पवार, अध्यक्ष कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल हॉल, देसाई इस्टेट, बारामती येथे सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर, सिनिअर महिला व पुरुष गटात पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपुरातील 13 वर्षीय माहिन सिकंदर खान ने वेगवान व अवघड समजल्या जाणाऱ्या कराटे स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकाविले.
मागील वर्ष भरापासून माहिन च्या पालकांनी तिला कराटे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती, माहिन चंद्रपुरातील फिट टू फाईट कराटे अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत होती.
माहिन ने या कालावधीत अनेक कराटे स्पर्धेत भाग घेतला, आधी जिल्हास्तरीय व आता थेट राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत माहिन ने सुवर्णपदक पटकाविले. माहिन ची आता राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
माहिन ने आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक विनय बोधे, मंजित मंडल व वडील सिकंदर खान, आई रोबिना खान यांना दिले आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात निघाला डॉक्टरांचा मोर्चा
जिल्हा संघटनेच्या वतीने स्पर्धेसाठी संघ तयार केले गेले होते ज्यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड, सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील साधारण 400 हून अधिक निवडक खेळाडू स्पर्धमध्ये सहभागी झाले, स्पर्धक एकमेकांशी काता(प्रात्यक्षिक प्रकार) व् कुमिते(फाईट) अश्या दोन प्रकारामध्ये लढले.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना नोव्हेंबरमध्ये दिल्ली (NCR) येथे नॅशनल कराटे फेडेरेशनच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.