Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव

ladki bahin yadi माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ओबीसी बांधवांसाठी आनंदाची बातमी : चंद्रपुरात 17 ऑगस्टला सुरू होणार ओबीसी वसतिगृह

अशी तपासा ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी

  • Ladki bahin yadi सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
  • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यावर महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर लाखो महिलांनी अर्ज भरला काहींचे अर्ज नामंजूर झाले, मात्र त्या महिलांना पुन्हा अर्ज भरण्याची मुभा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

या योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. नारीशक्ती या एप वरून लाखो महिलांनी आपला अर्ज एडिट केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!