inspired talks एक चांगल आयुष्य जगत असताना आपल्यावर दुर्घटना ओढावली की आपलं आयुष्य नष्ट होण्याच्या मार्गावर असतो मात्र त्या प्रसंगाला न जुमानता त्याला सामोरे जातो तो खरा योद्धा असतो असाच एक प्रसंग चंद्रपुरातील पडोली या भागात घडला.
अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी एक खिडकी उपक्रम सुरू करा – आमदार किशोर जोरगेवार
Inspired talks खुटाळा येथील नर्स असलेल्या पूजा हलदारची दुचाकी स्लिप झाल्याने तो पडोली चौकात पडली आणि त्याच क्षणी मागून येत असलेल्या ट्रक चे चाक पूजाच्या पायावरून गेले, या अपघातात पूजाला एक पाय गमवावा लागला. पूजा ला कायम अपंगत्व आलं, मात्र त्या अपघातातून सुखरूप बचावत पूजाने आपल्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू केला.
पूजाला बघण्यासाठी मित्र, नातेवाईक भेटायला आल्यावर ती त्यांच्याशी हसत खेळत बोलायची तिच्या चेहऱ्यावर अपंगत्वाचे कसलेही भान दिसून येत नव्हते, कारण पूजाने स्वतःला तसं तयार केलं.
आपल्या क्षेत्रातील एका मुलीवर हा गंभीर प्रसंग ओढावला अशी बाब चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांना कळली, क्षणाचाही विलंब न करता आमदार जोरगेवार खुटाळा येथे पोहचले, आणि पुजाशी त्यांनी संवाद केला, पूजा ने घडलेला सर्व प्रसंग आमदार जोरगेवार यांना न खचता सांगितला, पूजा च्या चेहऱ्यावरील हावभाव असे सांगत होते की ती आता आपला भूतकाळ मागे टाकत नव्या भविष्याची सुरुवात करीत आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांना पूजा सोबत संवाद साधत असताना तिच्या चेहऱ्यावरील धाडस आणि आत्मविश्वास पाहून तिचं कौतुक करावं वाटत होतं. तीच हे धाडस दिव्यांगत्व आल्याने निराश झालेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
अपघातामुळे अपंगत्व येऊन सुद्धा तिच्या लढण्याची असलेली धमक आणि जिद्द ही वाखाणण्याजोगे आहे. तिच्या चेहऱ्यावर एक विश्वास होता तो म्हणजे ती हार मानणाऱ्या मधील नाही.. जीवनात कितीही संकटे आली तरी इच्छाशक्ती असल्यावर अशक्य असं काहीच नाही, हे तिच्या संवादादरम्यान प्रकर्षाने जाणवत होते. तिच्यात असलेली. इच्छाशक्ती आणि जिद्द पाहून “धाडसी पूजा तू एक दिवस पुन्हा धावशील आणि या परिस्थितीवर विजय मिळवशील…. असे उदगार आमदार जोरगेवार यांनी यावेळी काढले, अपंगत्व आल्यावर आयुष्यात काय समस्या येतात ते न अनुभवलेलं बरं मात्र पूजाला बघून आमदार जोरगेवार म्हणाले की ज्यांना अपंगत्व आलं आणि हताश झाले त्यांनी पूजा कडे बघा तिचा आत्मविश्वास आपल्याला प्रेरणा देणारा आहे तीच पुढचं आयुष्य सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिली.
brave #stubbornness #धाडसी #जिद्द #प्रेरणा #अभिमान #inspiration