Muddy Water : पोंभूर्णा शहरातील नागरिक पित आहेत तीन दिवसांपासून गाळयुक्त अशुद्ध पाणी

muddy water दोन महिन्यांपासून फिल्टर मशीनच नादुरुस्त ;आलम संपलेला. -विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांची मुख्याधिकारीकडे तक्रार

पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरात मागील तीन दिवसांपासून अशुद्ध व गाळयुक्त पाणी पुरवठा होत असून येथील जनतेला अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मात्र एवढी भयंकर समस्या असतांना सुद्धा नगरपंचायत प्रशासन धृतराष्ट्राच्या भुमीकेत आंधळे बनून लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.करोडो रूपये खर्चून बांधलेल्या फिल्टर प्लॅटमध्ये मागील दोन महिन्यांपासून पाणीच फिल्टर होत नाही.फिल्टर मशीन बंद आहे,आलम आठवड्याभरापासून संपलेला आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली


Muddy water फोरटूलेटर मशीन बंद आहे,वाॅश वाॅटर टॅंकची मोटार बंद आहे, स्टार्टर मशीन बंद आहे,जाडी बेड बंद आहे. असे असताना सुद्धा शुद्धीकरणाच्या नावावर नगर पंचायत शहरवासियाची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशीच नाही तर जीवनाशी सुद्धा खेळ खेळत आहे. शहरवासियांच्या समस्येबद्दल काही लेना देना नसलेल्या नगर पंचायतच्या भोंगळ कारभारामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.

Muddy water रस्त्या रस्त्यावर स्वागत गेट बांधून विकासाचे मॉडेल म्हणून नाव मिरवणाऱ्या पोंभूर्ण्यात पाणी टंचाईची झळ तर सोसावी लागत होतीच मात्र आता तर येथील नागरिकांना गाळयुक्त अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.मागील तीन दिवसापासून शहरात गाळयुक्त व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची बोंब नागरिक करीत होते.याबाबत विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी तातडीने रात्री आठ वाजताच्या दरम्यान फिल्टर प्लॅंट गाठून तेथील पाहणी केली असता.करोडो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर प्लॅटमध्ये फोरटूलेटर मशीन बंद,वाॅश वाॅटर टॅंकची मोटार बंद,स्टार्टर मशीन बंद,जाडी बेड चोकअप,तर आलम तर पुर्णपणे संपलेला असल्याचे निदर्शनास आले.बीना आलमनेच शहरातील पाणी पुरवठा होत असल्याने गढूळ पाणी पुरवठा केल्या जात असल्याची माहिती समोर आली. एवढेच नव्हे तर दोन महिन्यांपासून फिल्टर मशीन बंद असल्याने अशुद्ध पाणी पुरवठा सुद्धा होत आहे.असे असताना सुद्धा शुद्धीकरणाच्या नावावर नगर पंचायत शहरवासियाची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी व जीवनाशी सुद्धा खेळ खेळत आहे.शहरवासियांच्या समस्येबद्दल काही लेना देना नसलेल्या नगर पंचायतच्या भोंगळ कारभारामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.फिल्टर प्लॅंटमध्ये एवढं बोगस काम सुरू असताना नगरपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमीकेत आंधळे बनून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.अशुद्ध व गढुळ पाणी पिल्याने शहरवासियांना डायरियाची लागण होण्याची शक्यता असताना सुद्धा नगरपंचायतने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली नाही.किंवा मागील अनेक महिन्यांपासून पाणी फिल्टर करणारे संयंत्र बंद असून त्याची रिपेअरींग करण्यात आली नाही.ठेकेदाराचे फिल्टर प्लॅंटकडे लक्ष नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र कवडीचे काम नसतांना लाखोंचे बिल घेणाऱ्या ठेकेदाराला नगरपंचायत पाठीशी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नगरपंचायतच्या अश्या धोरणामुळे नागरिकांमध्येही आता रोष व्यक्त होताना दिसत आहे.
Muddy water गढुळ व दुषीत पाणी पुरवठा याबाबत आशिष कावटवार यांनी मुख्याधिकारी यांना फोनवर समस्या सांगितली असता मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी फिल्टर प्लॅटमध्ये तात्काळ येऊन पाहणी केली असता गढुळ पाणी, फिल्टर मशीन बंद असे अनेक प्रकार पाहताच मुख्याधिकारी यांनी आशिष कावटवार यांना आश्वस्त करीत शहरातील नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा केल्या जाणार असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक अतुल वाकडे, बालाजी मेश्राम, अभिषेक बद्दलवार यांची उपस्थिती होती.

एसीच्या कार्यालयात बसून नागरिकांना पिण्यासाठी गढुळ पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणारे पदाधिकारी व अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
ठेकेदाराला लाखो रुपये भुगतान करून लोकांना अशुद्ध व गढुळ पाणी प्यावे लागत आहे.याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.व येत्या दोन दिवसांत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा जनतेला घेऊन नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.
-आशिष कावटवार,विरोधी पक्षनेते नगरपंचायत पोंभूर्णा

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!