warora vidhansabha राज्याची आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांनी होणार आहे, त्यापूर्वी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व नव्या चेहऱ्यानी विधानसभा क्षेत्रात तयारी सुरू केली आहे.
मात्र भद्रावती येथील माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख यांनी उमेदवारी दिल्यास मी 75 हजार मतांची आघाडी घेत निवडणूक जिंकणार असा दावा केला आहे, त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचेकडे विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे.
गुन्हेगारी : चंद्रपुरात भरदिवसा गोळीबार, टोळीयुद्ध भडकले, कुख्यात गुंड हाजी सरवर ची हत्या
Warora vidhansabha विशेष म्हणजे आत्राम यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे, त्यांच्या मागणीवर पक्षप्रमुख काय करतात ही तर येणारी वेळ सांगणार, त्यापूर्वी मीनल आत्राम कोण आहे याबाबत आपण जाणून घेऊ…
शिवसेना जिल्हा प्रमुख महीला आघाडी चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हयातील वरोरा विधानसभा ७५ हि विधानसभा शिवसेना पक्षाचे गड आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना माणनारा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे. येथे शिवसेना पक्षाचे संघटन तसेच महिलांचे संघटन मजबुत असुन या क्षेत्रामध्ये कार्यकत्यांची खुप मोठी फळी असून या विधानसभेची मागणी सौ मिनलताई आत्राम यांनी एकनाथजी शिंदे साहेब, मुख्य नेते शिवसेना पक्ष तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे केली आहे.
योजना : लाडकी बहीण योजनेचे फक्त या महिलांना मिळणार 3 हजार रुपये
सौ मिनल ज्ञानेश्वर आत्राम भद्रावती ता. भद्रावती जि.चंद्रपूर येथील मुलगी असून आदीवासी समाजाची मुलगी आहे. त्या गेल्या ३० वर्षापासून शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ काम करीत असून शिवसेना पक्षाची कट्टर शिवसैनिक महिला कार्यकर्ती आहे. आत्राम ह्या भद्रावती नगर पालीकेची माजी नगराध्यक्षा असून तिन वेळा नगरसेवक म्हणुन निवडून येत आहे व विद्यमान नगर सेवक आहे. अध्यक्ष पदाच्या कारकीर्दी मध्ये भद्रावती शहराचा सर्वांगीन विकास करुन डेव्हलपमेन्ट सिटी तयार केली. पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्वाना सोबत घेवुन गावाचा विकास केला त्यामुळे विकास कामाच्या नावाने व शिवसेना पक्षामुळे माझे चांगले नाव आहे तसेच या क्षेत्रामध्ये माझी चागली पकड असुन भद्रावती-वरोरा शहरामध्ये शिवसेना पक्षाचे अनेक आंदोलन केले आहे.
विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन महिलांचे संघटन मजबूत केले तसेच महिलांचे मेळावे घेतले व महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मदत केली. या विधानसभे मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून आता परत एकदा शिवसेना पक्षाने शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी चंद्रपूर या पदाची जबाबदारी दिली असुन यामुळे पक्षाचे कार्यक्रम घेणे, संकटकाळी नागरीकांना मदत करने यामुळे पुन्हा माझा जनसंपर्क वाढला आहे. सध्या आत्राम ह्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत असून चंद्रपूर जिल्हयात संपूर्ण तालूका प्रमुख व शहर प्रमुख महिलांच्या नियुक्ति करुन महिलांचे संघटन मजबूत फळी तयार केली असुन ते माझ्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे. या विधानसभा क्षेत्रातला प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता व पदाधिकारी याचा मला पाठींबा असुन माझ्या सोबत खंबीरपणे उभे आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभा ७५ या क्षेत्रातील संपूर्ण आदिवासी समाज माझ्या सोबत असून मी आदिवासी समाजाची विदर्भ अध्यक्ष महिला या पदावर काम करीत आहे. तसेच दलित, ओ.बी.सी व ईतर समाज माझ्या सोबत असून सर्व जनतेचा मला पाठींबा असल्याने यांचा आशिर्वादा माझ्या सोबत असल्याने या विधानसभे मध्ये माझा विजय निश्चीत आहे व मी ७५ हजार मतांनी लीड घेऊन निवडून येणार.
मी सर्व क्षेत्रामध्ये सक्षम असुन येथे मला तोड नाही. तरी एकनाथजी शिंदे साहेब आपण माझ्या ३० वर्षापासुन पक्षात केलेल्या कामाची दखल घेवून मला कामाची पावती म्हणून वरोरा विधानसभा ७५ ची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हा प्रमुख महीला आघाडी चंद्रपूर यांनी एकनाथजी शिंदे यांचेकडे केलेली आहे.