crop insurance गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात पाऊस पडला नसल्याचे कारण पुढे करून पाच हजाराच्या वर शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज दि. ओरिएंटल इन्शुरन्स या पिक विमा कंपनीने रिजेक्ट केले. त्यामुळे मुल सावली तालुक्यातील सर्व शेतकरी पिक विमा मदत निधी मिळण्यासाठी अपात्र ठरले. काही ठराविक निवडक शेतकऱ्यांना पिक विमा निधी देऊन कंपनीने आपली जबाबदारी झटकली.
Crop insurance अवश्य वाचा : उभ्या ट्रक ला चारचाकी वाहनाची धडक, 4 युवकांचा मृत्यू
याबाबतच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यानी केल्या. उदा. मुल तालुक्यातील मौजा येरगाव येथील विमा धारक शेतकरी मोहन विश्वनाथ नागपुरे यांचे कुटुंबातील १९०,२४७, यांना विम्याचे पैसे देण्यात आले. परंतु याच शेतीला लागून एकच धुरा असलेल्या सर्व्हे नंबर १३१,२७३, १८५,९०, हा नंबर असलेल्या मोहन नागपुरे यांना विक विम्यापासून वगळण्यात आल्याचे प्रत्यक्ष कागद पत्राची तपासणीत लक्षात आले.असे हजारो शेतकरी संतप्त असून पिक विमा कंपनीचे अधिकारी शुभम बनसोड यांचेशी संपर्क साधला असता.ते “नॉट रिचेबल”झाले.
Crop insurance सहकार सोसायटी तर्फे व प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयात काढण्याचे आदेश शासनाने दिले. चंद्रपूर जिल्हा पीकविमा नोंदणीत आघाडी घेतली.
पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र, धानपट्ट्यात अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर धान उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्याने पिक विमा मिळाला पाहिजे म्हणून मुल सावली कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. व न्यायालयीन लढा, देण्यासाठी मुल, सावली, पोंभूर्णा तालुक्यातील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांकडून हजारो आनलाईन विमा पावत्या जमा केल्या.
नागपूर हायकोर्ट तर्फे एड.अजय एम.घारे यांचे मार्फतीने दिनांक ७/८/२०२४ ला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, मुख्य कार्यालय,नागपूर यांना शेतकऱ्यांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी नोटीस बजावले.त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे धाबे दणाणले असून विमा देण्यासाठी धावपळ करीत आहे.