Young chanda brigade गुरु हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कृपेमुळे, मार्गदर्शनाने आणि शिकवणीने आपली समाजव्यवस्था अधिक सशक्त झाली आहे. विविध क्षेत्रात गुरुंचे मार्गदर्शन आपल्याला लाभते, जे अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातात. आजचा हा परंपरागत गुरुंचा सन्मान समारंभ त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार
गुरु पोर्णिमे निमित्त आज रविवारी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, सरदार हरविंदर सिंग धुन्ना, डॉ. दाभारे, डॉ. रजनिकांत भलमे, गोपाल मुंदडा, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, श्याम धोपटे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नकुल वासमवार, दयानंद नागरकर, जय मिश्रा, कार्तिक बोरेवार, कल्पना शिंदे, नंदा पंधरे, रूपा परसराम, विमल कातकर, दर्शना चापले, निलिमा वनकर, वंदना हजारे, अल्का मेश्राम, शांता धांडे, कौसर खान, अनिता झाडे, आशु फुलझेले, आशा देशमुख, मंजुषा दरवरे, सरोज चांदेकर, अस्मिता दोनाडकर, माधुरी निवलकर, दुर्गा वैरागडे, कविता निखारे, प्रियंका हजारे आदींची उपस्थिती होती.
young chanda brigade आजच्या युगात स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. अशात योग्य गुरुंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. व्यवसायात प्राविण्य प्राप्त अनेकजन आपले कलागुण दुसऱ्यांना देत स्वावलंबी बनवत आहेत. अशा ज्ञानाचे भांडार असलेल्या गुरुंची समाजालाही गरज आहे. आज अशाच परंपरागत गुरुंचा आपण सन्मान करत आहोत. हे गुरु स्वतःजवळील ज्ञान दुसऱ्यांना देण्याचे काम करत आहेत. यामुळे पारंपारिक व्यवसाय आणि हस्तकला जपली जात असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले.
गुरु-शिष्य परंपरेचा एक सुंदर प्रवास आपण पाहिला आहे. यामध्ये ज्ञानाचा, संस्काराचा आणि मूल्यांचा वारसा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजतेने हस्तांतरित होत असतो. गुरुंचे आशीर्वाद म्हणजेच आपल्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. आजच्या या सन्मान समारंभात, आपण या गुरूंचे योगदान, त्यांचा परिश्रम आणि त्यागाचा गौरव करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, गुरुंच्या आशीर्वादामुळे आपले जीवन अधिक सशक्त आणि सुसंस्कारित बनले आहे. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने, आपण जीवनातील अडचणींवर मात करून यशाची शिखरे गाठू शकतो, असे ते म्हणाले.
यावेळी पेंटर, सुतार, वेल्डर, चालक, मेकॅनिक, ऑटो चालक, जिम ट्रेनर, मूर्तिकार, मूर्ती पेंटर, मच्छीपालन, गाय पालन, पार्लर प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग, शास्त्रीय संगीत, फेटे बांधणेवाला, मंडपवाला, संगीत प्रशिक्षण, क्रीडा, नाटक दिग्दर्शक, बँड प्रशिक्षक, मटका कुंभार, शिवणकला, बुटीक, झुंबा, केक, योग शिक्षक, भजन आरती प्रशिक्षिका, योग नृत्य, सलून, सुवर्णकार, चित्रकार, भजन प्रशिक्षक, फोटोग्राफर, पुजारी, ऑर्केस्ट्रा अशा विविध क्षेत्रातील परंपरागत गुरुंना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.