chandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?

chandrapur firing case 12 ऑगस्टला चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांची गोळ्या झाडून हाती करण्यात आली होती, या प्रकरणी पुन्हा 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
छोटे मोठे गुन्हे करीत राजकीय आश्रय घेत गुन्हेगारी विश्वात आपलं वट जमविणारे हाजी यांचा क्रूर अंत झाला. सदर हत्याकांडात अनेकांनी दबक्या आवाजात एकच प्रतिक्रिया दिली “बरं झालं’.

image


Chandrapur firing case 18 ऑगस्टला पोलिसांनी नकोडा येथील अक्षय मारोती रत्ने, सय्यद अबरार इंतसार अहमद, मोहसीन नसीर शेख चंद्रपूर, अभिजित उर्फ पवन मोरेश्वर कटारे, शेख नसिफ शेख रशीद, अखिल जमील कुरेशी, नूर अहमद अब्दुल वहाब कुरेशी यांना एक दिवसांपूर्वी अटक करीत आज न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने 7 आरोपीना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

योजना : 27 लाख लाडक्या बहिणी पहिल्या हफत्याच्या प्रतीक्षेत

नेमकं प्रकरण काय?

12 ऑगस्ट रोजी कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख हे आपल्या सहकाऱ्यासोबत चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी आले होते, काही वेळाने 5 युवकांच्या टोळक्याने हाजी सरवर यांच्यावर गोळ्या झाडत चाकू हल्ला केला, यामध्ये हाजी यांचा मृत्यू झाला, आरोपीनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा गाठत आत्मसमर्पण केले.

गुन्ह्यानंतर पोलिसांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, जिल्ह्यात गोळीबार आता काही नवा नाही, 40 दिवसात गोळीबार व बॉम्ब च्या घटनेने जिल्हा आधीच हादरून गेला आहे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थे प्रश्न उपस्थित झाला आहे, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा ढेपाळली की काय असा प्रश्न जनसामान्य उपस्थित करू लागले होते.

7 आरोपीना पोलिसांनी अटक केली ज्यामध्ये 2 आरोपी घुग्गुस तर 5 जण चंद्रपुरातील आहे, यांनी हाजी च्या मारेकऱ्यांना शरण, हाजी चे लोकेशन व या कटात सामायिक असल्याचा संशय आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एक राजकीय पदाधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे, तो पुढारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, अवैध वाळू तस्करी मध्ये त्याचा सहभाग असून त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी जवळचे संबंध असून तसे फोटो सुद्धा पुढे आले आहे.

जर पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास केला तर काही राजकीय क्षेत्रातील वाळू तस्करांचे नाव व त्यांचा सहभाग यामध्ये समोर येईल. सध्या तो आरोपी आमचा राजकीय पदाधिकारी नव्हे अशी बोंब वर्तमान पदाधिकारी करू लागले आहे, पोलिसांनी आरोपी तस्करांचे कुणाबरोबर संबंध आहे, त्यांचा तर या प्रकरणाशी संबंध तर नाही? याकडे तपास केल्यास खुनी तस्करांचे नाव पुढे येईल.

मृतक हाजी चे अनेक राजकीय पदाधिकारी यांच्यासोबत चांगले संबंध होते, हे त्यांच्या अंतिम समयी जवळ आले होते, आता आरोपी या कटात राजकिय आरोपीची एंट्री झाल्याने अजून कुणाचे नाव समोर येणार ही तर येणारी वेळच सांगेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!