Hindu Samaj चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने 23 ऑगस्टला चंद्रपूर बंद चे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला साथ देत चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी 100 टक्के बंद पाळला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी
Hindu samaj बंगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतली.असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत. हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे. मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार असल्याचे सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की जर बांगला देशात हिंदूंवर अत्याचार करणार तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
बल्लारपूर विधानसभा – राहुल गांधी यांचे निकटवर्तीय रोशन लाल यांचा दावा
आयोजित सकल हिंदू समाजाच्या चंद्रपूर आक्रोश मोर्च्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामील झाले होते.
हसीना पळून गेल्यापासून 278 ठिकाणी हल्ले
मंगळवारी बांगलादेशातील हिंदूंच्या शीर्ष संस्थेने सांगितले की, पंतप्रधान शेख हसीना यांच्या पदावरून पळून जाण्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला देशभरातील 48 जिल्ह्यांमधील 278 ठिकाणी हल्ले आणि धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसाचारात हिंदूंच्या व्यवसायाचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आणि हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला.
“हा केवळ व्यक्तींवरील हल्ला नाही तर हिंदू धर्मावरील हल्ला आहे,” असा आरोप करत अलायन्सचे प्रवक्ते आणि कार्यकारी सचिव पलाश कांती दे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. “सोमवारपर्यंत, 48 जिल्ह्यांमधील 278 ठिकाणी हिंदू समाजावर हल्ले आणि धमक्या झाल्या आहेत. आम्ही गृह व्यवहार सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसैन यांच्याकडे आमच्या चिंता मांडल्या आहेत, ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल,” असे ते ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने उद्धृत केले.
मुहम्मद युनूस यांनी हिंदू समाजाशी संवाद साधला
मुहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून 8 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात जाऊन त्रस्त हिंदू समाजातील सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी लोकांना त्यांच्या सरकारची भूमिका ठरवण्यापूर्वी “संयम बाळगण्याचे” आवाहन केले.
“अधिकार सर्वांसाठी समान आहेत. आपण सर्व एक लोक आहोत आणि आपल्या सर्वांचा एकच अधिकार आहे. आपल्यात कोणताही भेदभाव करू नका. कृपया, आम्हाला मदत करा. संयम बाळगा आणि नंतर आम्ही काय करू शकलो आणि काय नाही हे ठरवा. जर आम्ही अपयशी ठरलो तर आमची टीका करा,” असे युनूस म्हणाले.
हिंदूंना का लक्ष्य केलं जातंय?
या घटनेनं धक्का बसला असला तरी फारसं आश्चर्य वाटलं नसल्याचं अविरूप सरकार यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना सामान्यतः शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगचे समर्थक मानलं जातं आणि इस्लामिक देशातील विरोधकांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्ले केले जातात.”
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर सोशल मीडियावर हिंदूंच्या संपत्ती आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांशी संबंधित बातम्यांचा पूर आला.
52 जिल्ह्यांत हिंदूंवर झाले हल्ले, मोहम्मद युनूस यांच्याकडे मागितले संरक्षण
बांगलादेशची लोकसंख्या 17 कोटी आहे, त्यात हिंदूंची संख्या 7.95 टक्के (1.35 कोटी) आहे. हिंदू धर्म हा बांगलादेशातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. देशातील 64 पैकी 61 जिल्ह्यांमध्ये हिंदूंची मोठी लोकसंख्या राहते. वृत्तानुसार बांगलादेशातील हिंदूंना हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे समर्थक मानले जाते. यामुळेच ते आता टार्गेट झाले आहेत. बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेनुसार, देशातील 64 पैकी 52 जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले. परिषदेने म्हटले आहे की, अल्पसंख्याकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे. त्यांनी सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याकडे सुरक्षा आणि संरक्षणाची मागणी केली आहे.