Rccpl cement company चंद्रपूर : राष्ट्रीय जनजाती आयोगाचे सदस्य मा. जातोथु हुसैन यांची समिती चंद्रपूर दौऱ्यावर आली होती. तेव्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे भाजपा अनु. जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धनराज कोवे यांनी भेट घेतली. समितीचे सदस्य मा. हुसैन यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
योजना : अभय योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – आमदार किशोर जोरगेवार
Rccpl cement company यावेळी कल्याण आश्रम चे प्राजोत हेपट, मोर्चाचे महामंत्री अरविंद मडावी,शुभम गेडाम, तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद विदर्भ विभाग जिल्हा शाखा चंद्रपूर चे जिल्हासचिव रवी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते अरूण मैदमवार तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी नितीन कोटणाके, सखाराम तलांडे हे उपस्थित होते. मा. हुसैन यांच्याशी चर्चे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील अनेक विषय घेण्यात आले.
चर्चेतील प्रमुख विषय म्हणजे कोरपना तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी खोटे दस्तऐवज दाखवून हडपल्या व खरेदी – विक्री केल्याची चौकशी करण्यात साठी सदर प्रकरणाची विस्तृत माहिती देतांना सांगितल की RCCPL सिमेंट प्रकल्प मुकुटबन या कंपनीला कोरपना तालुक्यातील परसोडा,गोविंदपुर,कोठोडा,रायपूर इत्यादी गावातील जवळपास सातशे छप्पन हेक्टर जमीन लाईमस्टोन करीता लिजवर देण्यात आली आहे. त्या क्षेत्रातील आदिवासींच्या जमिनी प्रकल्पात येत असल्याने तात्काळ कंपनीने बाजार भावाप्रमाणे सरळ खरेदी करणे अपेक्षित अस्ताना, मात्र कंपनी विलंब करीत असल्याने काही दलाल त्या भागात सक्रिय झाले आहेत.
स्वतःच्या फायदयासाठी विविध शक्कल लढवून गरीब आदिवासींना लुटत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे असे की ते दलाल आदिवासींच्या जमिनी सत्तर वर्षांच्या पूर्वी असलेल्या निजाम यांच्या असल्याचा बनावट इतिहास पुढे करून सबंधित विभागातील काही प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मिळून निजामाचे वंशज हे मुळमालक आहेत असे खोटे दस्तऐवज दाखवून त्यांचे नावाने सातबारा तयार केले आहे. आणि त्या जमिनीची खरेदी – विक्री दलालांनी स्वतः केली आहे. मात्र त्या जमीन आजही आदिवासी यांच्या ताब्यात आहे हे विशेष! परंतु त्या जमिनी खरेदी विक्री होत आहे आणि आदिवासी शेतकऱ्यांना काही न कळता त्याचे नाव कमी होऊन निजामाचे नावे सातबारा करण्यात येत आहे. त्याच जमीन आज दलालानी खरेदी केल्या आहेत.
आदिवासींच्या जमीन हळपण्याचा सपाटा दलालानी चालविला आहे. हा एक मोठ्ठा घोटाळा आहे. या गंभीर प्रकरनाची माहिती राष्ट्रीय जनजाती आयोगाचे सदस्य हुसैन यांना सविस्तर देण्यात आली. तेव्हा सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणातील सर्व पुरावे सादर लवकर करण्यात येईल. असे भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज कोवे यांनी सांगितले. तेव्हा सदर प्रकरणात जिल्ह्यातील काही मोठे नेते व त्यांच्याशी संबध असणारे जमीन खरेदीदलाल यांच्यावर चौकशीअंती काय कारवाही होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.