Red alert भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येल्लो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो.
Red alert अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे, दुपारपासून विजेचा कडकडाट सुरू झाला होता, सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादी प्रसिद्ध, नागरिकांनी आपले नाव यादीत तपासावे..अन्यथा निवडणुकीच्या दिवशी….
Red alert चंद्रपूर जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेड क्वार्टर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
रेड अलर्ट
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासह तत्सम नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जाताे. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो.
थोडक्यात रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. रेड अलर्ट दिल्यानंतर आपात्कालीन विभाग, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, NDRF, SDRF मदत आणि पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, समुद्रकिनारी असमारे तटरक्षक दल आदी प्रमुख विभाग सतर्क राहत असतात. या अलर्टमध्ये यंत्रणा तातडीने काम करण्याची गरज असते. कोणतीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याची सर्वतोपरी काळजी या यंत्रणा घेत असतात.