rice mill गुरू गुरनुले मुल – मुल नागपुरे राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी नारायण राईस मिलच्या बाजूलाच अमोल एंटर प्रायजेस कंपनीची राईस मिल अनेक वर्षापासून उत्कृष्ठ तांदळाचे उत्पादन करीत आहे. सध्या स्थितीत गेल्या बारा दिवसापासून दिवस रात्री पाऊस येणे सुरूच आहे.
अवश्य वाचा : पत्रकारांच्या मुलाची लंडन भरारी
Rice mill दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास अमोल एंटर प्रायजेस कंपनीची उच्च प्रतीच्या तांदळाचे लाखो टन उत्पादन करणारी राईस मिल आहे. याच राईस मिलला लागूनच कोंड्याचे शेड आहे. याच शेडला रात्रीला ३ वाजता सुमारास अचानक आग लागल्याने शेड मधील पूर्ण कोंडा व राईस मील मद्ये असलेले उच्च प्रतीच्या धानाचे ५००० हजार पोते स्टॉक होते.त्यातील १०० पोते जळून खाक झाले. यात लाखोचे नुकसान झाले असल्याचे अमोल एंटर प्रायजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांनी आमच्या प्रतीनिधि जवळ प्रत्यक्ष पाहणी करतांना सांगितले.