Road Accident : चंद्रपूर-बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली

Road accident चंद्रपुरातील बाबूपेठ जवळील बायपास मार्गावर 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास ट्रक चे स्टेअरिंग लॉक झाले आणि अनियंत्रित ट्रक पुलाच्या बाजूला कोसळला.


सकाळच्या सुमारास MH40 CD 7991 हा ट्रक कंटेनर घेऊन बल्लारपूर च्या दिशेने जात होता, बाबूपेठ जवळील पुलावर ट्रक पोहचला असता अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले, वाहन चालक घाबरला आणि त्याला या दरम्यान फिट आली त्यामुळे ट्रक सरळ पुलाच्या कठड्याजवळ कोसळला अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

अवश्य वाचा : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचा शेवटचा टप्पा पूर्ण


Road accident वेळीच ट्रक कठड्याजवळ कोसळला अन्यथा पुलाच्या बाजूला असलेल्या घरात ट्रक शिरला असता त्यामुळे मोठी दुर्घटना झाली असती.
या अपघातात वाहन चालक जखमी झाला असून अपघातांनंतर तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्यावेळी रस्त्यावर वाहतूक नव्हती अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, परिसरातील नागरिकांनी तात्काळ वाहन चालकाला रुग्णालयात नेले.

विशेष बाब म्हणजे या मार्गावरून सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रेलचेल असते, स्कुल बस, ऑटो रिक्षा, व पालकवर्ग या मार्गावरून मुलांना शाळेत घेऊन जात असतात, जर या रेलचेल वेळी हा अपघात झाला असता तर मोठा अपघात या मार्गावर झाला असता, वाहन चालक व स्कुल बस चालक व पालकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यायला हवी.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!