Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

Ballarpur Assembly आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यावर आता पक्षातूनचं स्पर्धा वाढलेली दिसत आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे.

राजकारण : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर


Ballarpur Assembly अश्यातच अनेक वर्षापासून महाविद्यालय काळातून राजकारणात उतरलेले NSUI चे माजी राष्ट्रीय सचिव रोशन लाल यांनी कांग्रेस पक्षातर्फे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दावेदारी सादर केली आहे.
त्यांनी प्रदेश कांग्रेस कार्यालयात विधानसभेसाठी अर्ज सादर केला आहे.

कोण आहे रोशन लाल?


पूर्वी कांग्रेस पक्षात गटबाजी नव्हती त्या काळात रोशन लाल यांनी NSUI या विद्यार्थी संघटनेत आपली पकड मजबूत केली.
NSUI चे जिल्हा अध्यक्ष बनल्यावर त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक लढवीत अनेकदा यश प्राप्त केले.
रोशन लाल जिल्ह्यातील राजकारणासह प्रदेश कार्यकारिणीत गेले व त्यानंतर थेट NSUI चे राष्ट्रीय सचिव पदावर अंतर्गत निवडणुकीत यशाचा झेंडा रोवत विराजमान झाले.

भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत प्रवासात रोशन लाल यांची साथ घेतली.
या दरम्यान कांग्रेस नेते व सध्याचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय बनले.
आज राष्ट्रीय कार्यक्रमात रोशन लाल हे राहुल गांधी यांच्या सोबत असतात.


बल्लारपूर विधानसभेसाठी उमेदवार देत असताना वडेट्टीवार व धानोरकर गटाचे द्वंद्व युद्ध बघायला मिळणार मात्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच जाहीर केले की उमेदवारी ही दिल्ली मधून घोषित होणार त्यामुळे रोशन लाल यांच्या नावावर कांग्रेस उमेदवारीचा शिक्का मोर्तब होण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. रोशन लाल यांच्या दावेदारी ने इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहे.

सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व आहे मात्र लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेसला मोठे मताधिक्य मिळाल्याने येणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची असणार हे मात्र खरे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!